Political News | श्रीरामपूरातील शिंदे सेनेच्या उमेदवाराच्या गाडीवर गोळीबार; नगर जिल्ह्यात खळबळ

0
34
#image_title

Political News | नगरचे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्या गाडीवर मंगळवारी मध्यरात्री गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Political News | नांदगावात राडा!; समीर भुजबळ-सुहास कांदे एकमेकांना भिडले

अज्ञातांकडून कांबळे यांच्या गाडीवर गोळीबार

याप्रकरणी भाऊसाहेब कांबळे यांच्याकडून श्रीरामपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून या घटनेनंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील अशोक सहकारी साखर कारखान्याच्या गेट समोर हा संपूर्ण प्रकार घडला असून भाऊसाहेब मतदारांच्या भेटीला गेले असता दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांकडून कांबळे यांच्या गाडीवर पाच गोळ्या झाडण्यात आल्या.

Political News | ‘बविआ’चा उमेदवार फुटला?; सहा तास राडा घालून अखेर हितेंद्र ठाकूर तावडेंसोबत रवाना

भाऊसाहेब कांबळे हल्ल्यात थोडक्यात बचावले

गोळीबारा वेळी हल्लेखोरांचा निशाणा चुकल्याने भाऊसाहेब कांबळे थोडक्यात बचावले असून रात्री दीड वाजेच्या सुमारास हा संपूर्ण प्रकार घडला आहे घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत, अज्ञात आरोपींविरुद्ध श्रीरामपूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here