Political News | विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया 20 नोव्हेंबर रोजी पार पडणार असून 23 नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. काल दिनांक 18 नोव्हेंबर रोजी प्रचाराची सांगता झाली यादरम्यान, राज्यभरात नेते आणि कार्यकर्त्यांवर मोठ्या प्रमाणात हल्ले झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह भाजपा उमेदवार यांच्या बहिणीवर चाकूने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली असून मतदानासाठी अवघे दोन दिवस बाकी असतानाच या घटनांमुळे निवडणूक प्रक्रियेला गालबोट लागल्याचे दिसून आले आहे. या घटनांमुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे झाले आहे. दरम्यान, राज्यात विधानसभा निवडणुकीच्या काळात एवढ्या मोठ्या प्रमाणात हल्ले, राडे झाल्याचे पहिल्यांदाच घडत आहे.
भाजपा उमेदवाराच्या बहिणीवर प्राणघातख हल्ला
अमरावतीतील धामणगाव विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार आमदार प्रताप अडसड यांच्या बहिणीवर चाकूने जीव घेणा हल्ला झाल्याची घटना सोमवारी रात्री अकरा वाजल्याच्या दरम्यान घडली. सात ते आठ अज्ञातांकडून प्रताप अडसड यांची बहीण अर्चनाताई रोटे यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. त्याचबरोबर हिंगोलीतील कळमनूर मतदारसंघाचे वंचित आघाडीचे उमेदवार डॉ. दिलीप मस्के यांच्यावर देखील रात्री एकच्या सुमारास पाच ते सहा जणांकडून जीवघेणा हल्ला करण्यात आला असल्याची घटना घडली आहे.
भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा
दुसरीकडे, चंद्रपूर जिल्ह्यातील मूळ तालुक्यात सोमवारी रात्री काँग्रेस व भाजपच्या कार्यकर्त्यांमधील वाद चिघळला सून जोरदार राडा झाल्याची घटना घडली. या घटनेत एका कार्यकर्त्याला गंभीर दुखापत झाली असून यावेळी प्रचाराची सांगता होऊन देखील भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार कोसंबी येथे सभा घेत असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला होता. काँग्रेस कार्यकर्त्यांना याबद्दल माहिती मिळताच त्यांनी सभा स्थळी पोहोचत, भाजप कार्यकर्त्यांना जाब वविचारला. यावेळी त्यांच्यात बाचाबाची होऊन दोन्ही गटात मारामारी झाली.
Political News | भाजपला पाठिंबा दिला म्हणुन वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी तोंडाला काळं फासत केली मारहाण
अनिल देशमुख यांच्यासह अपक्ष उमेदवाराच्या कारवर दगडफेक
छत्रपती संभाजीनगर मध्ये देखील गंगापूर विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवाराच्या गाडीवर हल्ला करण्यात आल्याची घटना घडली. अपक्ष उमेदवार सुरेश सोनवणे यांच्या कारवर आठ ते दहा जणांकडून दगडफेक करण्यात आली. असून सोनवणे यांच्यासह चार ते पाच जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान सोमवारी रात्री राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कारवर ही दगडफेक करण्यात आली होती. यामध्ये देशमुख यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून देशमुखांकडून हा हल्ला भाजप कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तर भाजप नेत्यांकडून हा आरोप फेटाळण्यात आला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम