Political News | ‘त्यांना मत देताय म्हणजे भाजपला मत देताय’; शेवटच्या सभेत युगेंद्र पवारांनी बारामतीकरांना केलं सावधं

0
30
#image_title

Political News | आज विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सांगता झाली. यावेळी प्रचाराच्या शेवटच्या सभेत बारामतीमध्ये योगेंद्र पवार यांनी, “तुम्ही दुसऱ्यांना अनेकदा संधी दिलीत, पण मला एक संधी देऊन बघा. आता पेक्षा जास्त चांगला काम करून दाखवतो.” अस़ आश्वासन जनतेला केलं आहे.

Political News | भाजपला पाठिंबा दिला म्हणुन वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी तोंडाला काळं फासत केली मारहाण

काय म्हणाले युगेंद्र पवार? 

“तुम्ही इतरांना संधी देऊनही आपली अनेक कामे अडकली आहेत. तीच तीच कामावर रखडून राहिली आहेत. मला संधी द्या, सर्वसामान्यांची काम करून दाखवतो. आता कुणाची काम होतात, हे तुम्हाला माहीत आहे.” असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. पुढे बोलत, “पवार साहेबांनी लोकांची काम केली. त्यामुळे लोक त्यांच्या मागे उभे आहेत. फक्त महाराष्ट्रातच नाही तर बारामतीतही तुतारी वाजणार असा दावाही त्यांच्याकडून यावेळी करण्यात आला.

आपण कधीच भाजपला मत दिले नाही

“आपण कधीच महायुतीला बारामतीत येऊ दिलेले नाही. आपण भाजपला स्वीकारलं नाही. जे आपल्याला सोडून गेले त्यांच्यापेक्षा जास्त आमदार भाजपचे आहेत. हा तालुका पुरोगामी विचार जपणारा असून आपण कधीच भाजपला मत दिले नाही. तुम्ही त्यांना मत देताय, म्हणजे भाजपला मत देताय. हे लक्षात ठेवले पाहिजे.” असे म्हटले.

Political News | नाशकात राज ठाकरेंना फटका; मनसेच्या उमेदवाराने हाती घेतली मशाल

पाणी प्रश्नावर काम करणार

तसेच विकासाच्या मुद्द्यावर बोलताना, “बारामती शाश्वत विकास करत असताना आपण पाणी प्रश्नावर काम करणार आहोत. जनाई-शिरसाई योजना पवार साहेबांनी आणली. मी पाणी आणल्याशिवाय शांत बसणार नाही. इंदापूर-दौडचं पाणी नकोय. पण मी हक्काचं पाणी आणल्याशिवाय राहणार नाही.” असा शब्दही युगेंद्र पवारांनी यावेळी दिला. त्याचबरोबर, “पवार साहेबांनी जसे पुण्यामध्ये पहिले आयटी पार्क काढले. तसेच आयटी पार्क आपण बारामतीमध्ये बांधून दाखवणार.” असे देखील त्यांनी यावेळी सांगितले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here