Political News | ‘चला जा..नाही देत मत’ म्हणत मतं मागायला गेलेल्या शिंदेंच्या आमदाराच्या पत्नीची हकालपट्टी

0
28
#image_title

Political News | विधानसभा निवडणुका अगदी काही दिवसांवर येऊन ठेपल्या असून राज्यभरात प्रचाराचा धुरळा उडाला आहे. प्रचारसभा, मेळाव्यांचे सत्र सुरू झाले आहे. तसेच उमेदवारांकडून ‘डोअर टू डोअर’ प्रचार करण्यात येत आहे. दरम्यान, शिवसेना शिंदे गटाचे नेते संतोष बांगर यांच्या पत्नीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून मत मागण्यासाठी गेलेल्या आमदार संतोष बांगर यांच्या पत्नीला मतदारांनी हकलावून लावले असल्याचे व्हिडिओतून निदर्शनास येते आहे.

Political News | अमित शहांच्या विधानावरून नव्या वादाला ठिणगी, संभाजी ब्रिगेड ने दिले खुले आव्हान; नेमकं प्रकरण काय?

नेमके काय घडले? 

राज्यात विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू असून त्याआधी मात्र राजकीय हालचालींना वेग आला आहे. कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांच्या पत्नीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून मतदान मागण्यासाठी गेलेल्या संतोष बांगर यांच्या पत्नीला मतदारांनी हकलावून लावले असल्याचे या व्हिडिओतून निदर्शनास येत आहे. या व्हिडिओत, बांगर यांच्या पत्नी एका घरी जातात आणि तिथल्या नागरिकांना 20 तारखेला धनुष्यबाणाला मतदान करायचे आहे असं सांगतात तेवढ्यात तिथे उपस्थित असलेला व्यक्ती नाही…नाही…देणार आम्ही मत असं म्हणताना दिसत आहे. तेवढ्यात प्रचाराला आलेल्या कार्यकर्त्यांनी तिथून काढता पाय घेतल्याचे दिसते.

दरम्यान, आमदार संतोष बांगर यांनी मतदार संघातील ‘जिल्ह्या बाहेर गेलेल्या मतदारांना परत आणण्यासाठी फोन पे करा’ असे खळबळजण वक्तव्य केल्याचा व्हिडिओ देखील काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. कळमनुरी येथील तोष्णीवाल मंगल कार्यालयात कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना त्यांनी, “विधानसभा निवडणुकी संदर्भात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. परंतु आचारसंहिता लागू असताना त्यांनी केलेल्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती.

Political News | ‘लोकसभेत केलेल्या प्रचाराची परत फेड करणार नाही’; रक्षा खडसेंनी केली भुमिका स्पष्ट

काय म्हणाले होते संतोष बांगर? 

यावेळी त्यांनी, “उमेदवारी अर्ज दाखल करताना मोठे शक्ती प्रदर्शन करण्यासाठी मिळेल तेवढ्या गाड्या आणा यासाठी मतदार संघातून बाहेर गेलेल्या कार्यकर्त्यांची देखील लिस्ट बनवा कार्यकर्त्यांना लागणाऱ्या जितक्या गाड्या असतील त्यासाठी लागणारे पैसे फोन पे करा. त्यांना सांगा येण्या-जाण्याची काळजी असेल तर त्याची ही व्यवस्था करू” असे म्हटले होते.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here