Raj Thackeray | आज राज ठाकरेंची डोंबिवली येथे सभा पार पडली. या सभेमध्ये त्यांनी महायुती व महाआघाडी आगामी विधानसभा निवडणूक व शिवसेना चिन्ह अशा अनेक मुद्द्यांवर भाष्य केले असून एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी शिवसेना व राष्ट्रवादी फोडली. त्यांनी या पक्षांचे चिन्ह व नाव घेतले यावर राज ठाकरेंनी आता भाष्य केले आहे. यावेळी त्यांनी आक्रमकपणे “शिवसेना उद्धव ठाकरे किंवा एकनाथ शिंदेंची नाही तर शिवसेना व धनुष्यबाण बाळासाहेबांची प्रॉपर्टी आहे” असं म्हणत दोघांवरही निशाणा साधला आहे.
Raj Thackeray | राज ठाकरे दोन दिवस नाशिकच्या दौऱ्यावर
राज ठाकरेंनी एकनाथ शिंदे आणि अजित पवारांवर साधला निशाणा
राज ठाकरेंनी प्रचाराचा नारळ फोडला असून राजू पाटील यांच्या मतदारसंघातून त्याच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. या ठिकाणी सभा घेत राज ठाकरेंनी प्रचाराच नारळ फोडला आहे. या ठिकाणी सभा घेत राज ठाकरेंनी प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे. या सभेत त्यांनी उद्धव ठाकरे अजित पवार एकनाथ शिंदे यांना लक्ष केले. यावेळी त्यांनी “यापूर्वी 2019 मध्ये निवडणुका झाल्या. निवडणुका संपल्यावर निकाल लागल्यानंतर अनेक घडामोडी घडल्या, सकाळचा शपथविधीही झाला. पण नंतर काकांनी डोळे वटारले अन् पंधरा मिनिटातच ते लग्न मोडले. मग नंतर ते घरी जाऊन म्हणाले, काका मला माफ करा. त्यानंतर ज्यांच्या विरोधात लढले त्यांच्यासोबतच युती केली. उद्धव ठाकरे ही ज्यांच्या विरोधात लढले नंतर त्यांच्याशीच मैत्री केली” असं म्हणत उद्धव ठाकरे आणि अजित पवारांवर टीका केली आहे.
Raj Thackeray | राज ठाकरेंची घोषणा.! महायुतीसोबत काडीमोड; काहीही करून आमदारांना सत्तेत बसवणार
शिवसेना आणि धनुष्यबाण बाळासाहेबांची प्रॉपर्टी
पुढे बोलत “एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे नाव व निशाणी घेतली अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे नाव व निशाणी घेतली. परंतु मी सांगू इच्छितो शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण ही एकनाथ शिंदे किंवा उद्धव ठाकरे यांची प्रॉपर्टी नसून ती बाळासाहेबांची आहे.” तुम्हाला काय राजकारण करायचं असेल ते करा. जे आमदार फोडायचे असतील ते फोड. पण आपण याला कसा हात लावता?” असा खोचक सवाल यावेळी त्यांनी विचारला.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम