Political News | भारत राष्ट्र समिती पक्षाचे अध्यक्ष आणि तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीआधी मोठा धक्का बसला आहे. महाराष्ट्रातील प्रदेश बीआरएस पक्ष आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात विलीन होऊ शकतो. अशी माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.
Political News | ‘…तर शिवसैनिक आत्महत्या करतील’; शिंदे गटाच्या आमदाराचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
लोकसभा निवडणुकीपूर्वी पक्ष महाराष्ट्रात दाखल झाला होता
येत्या 6 तारखेला राज्यातील बीआरएसचे पदाधिकारी पुण्यात शरद पवार यांच्या उपस्थितीत शरद पवार गटात प्रवेश करतील असं सूत्रांनी सांगितला आहे. तर राज्यातील बीआरएसच्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांची शरद पवार यांच्यासोबत बैठक पार पडली. यानंतर ही माहिती समोर आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधी भारत महाराष्ट्र समिती पक्ष महाराष्ट्रात दाखल झाला होता. त्यावेळी के. चंद्रशेखरराव यांनी स्वतः नागपूरमध्ये येऊन आपल्या पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन केले होते.
त्यावेळी चंद्रशेखर राव, “बीआरएस पक्षाचा उद्देश देशात उच्च दर्जाच्या बदलाची गरज हा आहे. आम्ही आमची सुरुवात महाराष्ट्रापासून केले असून यानंतर आम्ही मध्यप्रदेश, राजस्थानचा असे करत पुढे जाणार आहोत.” असे म्हणाले होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम