Nilesh Rane | निलेश राणेंची भाजपला सोडचिट्टी; उद्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत धनुष्यबाण हाती घेणार!

0
6
#image_title

Nilesh Rane | राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर घडामोडींना वेग आलेला पाहायला मिळत आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे ज्येष्ठ पुत्र निलेश राणे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदेसेनेत प्रवेश करणार असल्याची बातमी मागील काही दिवसांपासून समोर येत होती.

Nilesh Rane | राणेंच्या दाव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या; बघा नेमकं प्रकरण काय..?

ही निवडणूक युती म्हणून लढणार- निलेश राणे

मात्र आज, पत्रकार परिषद घेत निलेश राणे यांनी भाजपतून बाहेर पडत शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती दिली आहे. उद्या बुधवार दि. 23 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 4 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ते पक्षप्रवेश करणार असून आज पत्रकार परिषद घेत त्यांनी ही माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले असून, आत्ताची विधानसभा निवडणुक आम्ही युती म्हणून लढणार असल्याचे म्हटले आहे.

Nilesh Rane | टिका करणे राणेंना भोवले; ठाकरेंच्या कार्यकर्त्यांकडून तूफान दगडफेक

सर्व नेत्यांनी मला लहान भावाप्रमाणे सांभाळून घेतले

यावेळी बोलताना, “मी 2019 ला राणे साहेबांसोबत नितेश राणे आणि आमच्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यासह भारतीय जनता पक्षात आलो. भारतीय जनता पक्षांमध्ये आल्यानंतर खूप आदर मिळाला. सगळ्या नेत्यांनी खूप आदर दिला. प्रेम दिले. भाजपामध्ये काम करण्याची शिस्त शिकायला मिळाली. ती जवळून पाहता आली. तसेच, देवेंद्र फडणवीस यांनी एका लहान भावाप्रमाणे मला सांभाळून घेतलं काही. पक्षामध्ये एक स्थान दिले. अडचणी आल्या त्यामधून मला बाहेर काढले. तसेच रवींद्र चव्हाण यांनी देखील एखाद्या भावाप्रमाणे मला सांभाळलं गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार यांनी देखील मला आपल्याला लहान भावाप्रमाणे सांभाळून घेतले.” असे त्यांनी यावेळी सांगितले.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here