Political News | राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या यादिला मुहुर्त लागला; ‘या’ 7 जणांच्या नावांवर शिक्कामोर्तब

0
81
#image_title

Political News | मागील अडीच वर्षांपासून प्रलंबित असलेल्या राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या यादीस मुहूर्त मिळाला असून महायुती सरकारकडून काल राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे 12 पैकी 7 जणांची यादी पाठविण्यात आली होती. त्याच यादीवर आज सकाळी राज्यपालांनी शिक्कामोर्तब केला आहे.

Political News | निवडणुकीआधीच काँग्रेसला फटका; आ. हिरामण खोसकरांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

या आमदारांना मिळाली संधी

या यादीत 3-2-2 असा फॉर्म्युला वापरण्यात आला असून, शिंदे सेनेला दोन, राष्ट्रवादी अजित पवार गटाला दोन आणि भाजपच्या वाट्याला तीन जागा देण्यात आल्या आहेत. यात भाजपकडून चित्रा वाघ, युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील आणि बंजारा समाजाच्या पोहरादेवी संस्थांचे बाबूसिंग महाराज राठोड यांना संधी देण्यात आली आहे. शिवाय राष्ट्रवादी काँग्रेसकडून मंत्री छगन भुजबळ यांचे पुत्र आणि नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार पंकज भुजबळ यांना संधी देण्यात आली असून, पश्चिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचा अल्पसंख्यांक विभागातून इद्रिस नाईकवाडी यांना संधी दिली आहे. तर शिंदे यांच्या शिवसेनेकडून मनीषा कायंदे आणि माझे खासदार हेमंत पाटील यांना संधी मिळाली आहे. यादरम्यान, आज दुपारी 12 वाजता विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे या नवनिर्वाचित आमदारांना विधान भवनात आमदारकीची शपथ देणार आहे.

Political News | अभिनेते सयाजी शिंदे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; अजित पवारांनी केली मोठी घोषणा

ठाकरे गटाकडून याचिका दाखल

आज राज्यपाल नियुक्त आमदारांचा शपथविधी सोहळा पार पडणार असून याच 7 विधानपरिषद आमदारांच्या शपथविधी विरोधात शिवसेना ठाकरे गट पुन्हा हायकोर्टात गेला आहे. ठाकरे गटाकडून या विरोधात हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली असून या याचिकेत राज्यपाल नियुक्त आमदार प्रकरणी हायकोर्टाचा अंतिम निर्णय राखीव असताना आमदारांची नियुक्ती करणे असंविधानिक असल्याचा आरोप ठाकरे गटाचे कोल्हापूर शहर प्रमुख सुनील मोदी यांनी केला. परंतु निकाल राखून ठेवत हायकोर्टाने राज्य सरकारला याबाबत कोणतेही निर्देश दिलेले नसल्याने नियुक्त्या कायदेशीर असल्याचा दावा सरकारच्या वतीने करण्यात आला आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here