Trambkeshwar : नाशिक ग्रामीण पोलिसांनी केला सत्तेऐंशी लाखांचा गुटखा जप्त

0
16

Trambkeshwar :नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनानुसार गुटखाविरोधी अभियान जिल्ह्यात सुरू करण्यात आलं आहे. याच अभियाना अंतर्गत त्रंबकेश्वर तालुक्यातील आंबोली रस्त्यावर गुटख्याची अवैध वाहतूक करणारा कंटेनर ग्रामीण पोलीस व उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचत पकडला आहे. यात सुमारे सत्त्याऐंशी लाख रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.

नाशिक ग्रामीण पोलिसांनी सहा जून पासून जिल्हाभरात गुटखा विरोधी अभियान सुरु केल आहे. या अभियानाच्या कारवाई दरम्यान पान टपऱ्या, गोडावून, दुकाने व इतर अस्थापणांची कसून चौकशी सुरु आहे.

याच दरम्यान गुरुवारी गुटख्याच्या आणखी एक कंटेनर ग्रामीण पोलिसांनी पकडला आहे. त्यातून सुमारे सत्त्याऐंशी लाख रुपयांचा गुटखा हस्तगत करण्यात आला आहे.

गुटख्याने भरलेला कंटेनर दिल्ली येथून मुंबई- -आग्रा रोडने त्र्यंबकेश्वर, जव्हार, मोखाडामार्गे भिवंडी येथे जात होता. प्रवासा दरम्यान त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील आंबोली टी पॉईंट येथे ग्रामीण पोलीस व उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून कंटेनर पकडला आहे. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

त्यात रुपये ८७,३८,१००/- लाखांचा एस एच के नावाचा गुटखा मिळून आला आहे. याप्रकरणी कंटेनर चालका विरुद्ध कलम ३२८,१८८,२७२,२७३भादवि नुसार पोलीस उपनिरीक्षक अश्विनी टिळे यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस निरीक्षक रामकृष्ण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली त्र्यंबकेश्वर पोलीस यंत्रणा तपास करत आहे. पोलिसांच्या कारवाईनंतर त्र्यंबकेश्वर सह नाशिक जिल्ह्यात स्वागत करण्यात येत आहे. तर ही कारवाई अशीच सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here