इंदिरानगर मध्ये हुक्का पार्लरवर पोलिसांची धाड

0
43

नाशिक : अंमली पदार्थ विरोधी विशेष पथकाने इंदिरानगर परिसरातील एका हुक्का पार्लरवर कारवाई करत हुक्क्यासाठी वापरले जाणारे साहित्य जमा करत हॉटेल मालकावर कारवाई केली.याबाबत सविस्तर वृत्त समोर आलाय की पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेल्या अंमली पदार्थ विरोधी विशेष पथकाला आयुक्तालयाच्या हद्दीत अवैधरित्या अंमली पदार्थ बाळगणाऱ्या आणि विक्री करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले होते.

NIA ला धमकीचा मेल; मुंबईला दहशतवादी हल्ल्याची धमकी

यावरून सदर पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हॉटेल द पेरू फार्म इंदिरानगर येथे अवैधरित्या हुक्का पार्लर सुरु आहे अशी माहिती मिळाली. यावरून पोलीस पथकाने हॉटेल पेरू येथे छापा टाकत हुक्का पॉट,हुक्का फ्लेवर आणि इतर साहित्य असा १६ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून हॉटेल मालक शंकर राजाराम पांगरे व नितीन शांताराम आहिरे यांना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.ही कामगिरी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे , प्रशांत बच्छाव,सहायक आयुक्त वसंत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी हेमंत नागरे, हवालदार आदींच्या पथकाने केली.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here