Pankaja Munde | मुख्यमंत्री पदाबाबत पंकजा मुंडे यांचे मोठे वक्तव्य!

0
45
#image_title

Pankaja Munde | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात प्रचाराचा धुरळा उडाला आहे. सर्वच पक्षांकडून प्रचार सभांचे आयोजन केले जात असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह राज्यातील अन्य प्रमुख नेत्यांनी ही सर्व मतदारसंघ पिंजून काढले आहेत. तर या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत पाहायला मिळणार असून सत्ताधारी आणि विरोधी तिहेरी गटबंधनात असल्यामुळे निवडून आल्यावर मुख्यमंत्रीपद कोणत्या पक्षाकडे जाणार याबाबत उत्सुकता आहे. अशातच शुक्रवारी झालेल्या सांगली येथील सभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी, “महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आगामी काळात मुख्यमंत्री होतील.” असे संकेत दिले आहेत. यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली असून आता पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री पदाबाबत मोठे विधान केले आहे.

Pankaja Munde | जातीवर जाणाऱ्यांची साथ द्यायची नाही; दसरा मेळाव्यात पंकजा मुंडेंनी स्पष्टच सांगितले

काय म्हणाल्या पंकजा मुंडे?

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराकरिता महाराष्ट्र दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी मोठे विधान केले. आगामी काळात महायुती सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असतील असे संकेत दिले आहेत. यावर बोलताना पंकजा मुंडे यांनी, “मुख्यमंत्री कोण होईल. तो सर्वस्वी अधिकार अमित शहा यांचा आहे.” असे सांगत त्यांच्या विधानाला दुजोरा दिला आहे. तसेच, “केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत असल्यामुळे राज्यांमध्ये महायुतीचे सरकार येणार असल्याचा विश्वास आहे.” महायुतीच्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी अहमदनगर येथील राहुरी मतदार संघातील शिराळा-चिंचोली येथे झालेल्या प्रचार सभेत त्यांनी हे विधान केले आहे.

Pankaja Munde | दसरा मेळाव्या आधीच पंकजा मुंडेंचे मनोज जरांगेंच्या मेळाव्याविषयी मोठे वक्तव्य

फेक नरेटिव्हचा उपयोग होणार नाही

दरम्यान, विरोधी पक्षाकडून लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभेला देखील संविधानाचा मुद्दा पुढे केला जात आहे. यावर भाष्य करत पंकजा मुंडे यांनी, नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले असून संविधानात कसलाही बदल झालेला नाही. ते अधिक सक्षम झालेले आहे. त्यामुळे अशा फेक नरेटिव्हचा उपयोग होणार नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here