PM Narendra Modi | मोदींचे नाशकात ‘शक्तिप्रदर्शन’; नेमकं पडद्यामागे चाललंय काय..?

0
33
Lok Sabha 2024
Lok Sabha 2024

PM Narendra Modi |  अयोध्येत राम मंदिराच्या उद्घाटनाच्या आधी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १२ जानेवारी रोजी नाशिकमध्ये दाखल होणार आहेत. यासाठी कारण हे राष्ट्रीय युवा महोत्सवाचे सांगितले जात असले तरी, नाशिकमध्ये पंतप्रधान मोदी हे आगामी लोकसभेच्या प्राचाराचे नारळ फोडणार असल्याची माहिती आहे.

PM Narendra Modi | मोदींचे शक्तिप्रदर्शन ?

एवढेच नाहीतर, स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच नाशिकचे खासदार होणार? याबाबतही काही महत्त्वाच्या हालचाली होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील आज पाहणी करण्यासाठी नाशिकमध्ये येणार आहेत. दरम्यान, या सर्व घडामोडिंच्या पार्श्वभूमीवर मोदी नाशिकमध्ये शक्ति प्रदर्शन करणार असल्याचे दिसत आहे. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदींचा नाशिकमध्ये भव्य दिव्य स्वरूपाचा ‘रोड-शो’ होणार असल्याचीही माहिती समोर आली आहे. दरम्यान, अजून यावर शिक्कामोर्तब झालेला नसून पंतप्रधान मोदींच्या खास सुरक्षापथक ‘एसपीजी’ (स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप) ने पाहणी केल्यानंतरच या ‘रोड-शो’ बद्दल जाहीर केले जाणार आहे.(PM Narendra Modi)

PM Narendra Modi | काय सांगता ! पंतप्रधान मोदी होणार नाशिकचे खासदार ?

मोदींचे हे एसपीजी पथक येत्या (दि.९) मंगळवार रोजी नाशिकमध्ये येणार पाहणीसाठी येणार आहे. या १२ जानेवारीला तपोवन मधील साधुग्राम येथे होणाऱ्या राष्ट्रीय युवा महोत्सवामध्ये मार्गदर्शन करण्याचे निमित्त साधत पंतप्रधान राज्याच्या आगामी लोकसभेच्या प्रचाराचे नारळ फोडण्यासाठी नाशिकमध्ये येत आहेत. दरम्यान, यावेळी सर्वप्रथम त्यांचे ओझर विमानतळावर आगमन होईल. त्यानंतर ते ओझर येथून हेलिकॅप्टरद्वारे औरंगाबाद रोडवरील निलगिरी बाग येथील नियोजित कार्यक्रमस्थळी मैदानावर दाखल होतील.(PM Narendra Modi)

दरम्यान, याच निलगिरी बाग ते साधुग्राम या अडीच कि.मी. इतक्या अंतरावर, सुमारे एक ते दीड कि.मी. अंतरावर हा ‘रोड शो’ करण्यात येणार असल्याची माहिती आहे. मात्र, अद्याप त्याबद्दल कुठलीही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. पंतप्रधानांच्या विशेष सुरक्षेसाठी एसपीजीचे पथक हे तैनात असून, या पथकाच्या सूचनेप्रमाणेच पंतप्रधानांच्या दौऱ्यात समावेश असलेल्या नियोजित सर्व स्थळांची पाहणी केली जात असते. त्यानुसार, या पथकाने येत्या ९ तारखेला सर्व पाहणी केल्या नंतरच पंतप्रधान मोदींच्या ह्या संभाव्य रोड शो बाबत अधिकृत माहिती मिळेल.(PM Narendra Modi)

PM Modi | मोदी नाशकात; काय आहे मोदींच्या ह्या दौऱ्यामागचे ‘गुपित’

नाशिकमध्ये राजकीय हलचालींना वेग 

नाशिकमध्ये एक थंडीत राजकारण हे चांगलेच तापले आहे. सकाळी संजय राऊत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा पाहणी दौरा, यानंतर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नाशिक दौरा आणि राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी नाशिकची निवड, आणि पुढे रोजी राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण न आल्यामुळे उद्धव ठाकरे यांचा २२ जानेवारी रोजीचा दौरा तसेच या निमित्ताने ठाकरे गटाच्या प्रचाराचा नारळ फोडण्याची शक्यता, महायुती सरकारची ‘शिवसंकल्प अभियान’ यामुळे नाशिक हे सध्या राज्याच्याच नाहीतर देशाच्याच राजकारणाचा केंद्रबिंदू होत असल्याचे चित्र दिसत आहे.(PM Narendra Modi)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here