PM Modi | पंतप्रधान मोदींचा आज शिर्डी दौरा; दुपारी अर्ध्या तासासाठी मंदिर बंद

0
10

PM Modi | देशाचे पंतप्रधान मोदी आज (दि.26) अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी आणि अकोले या दोन ठिकाणी मोंदींच्या हस्ते विविध कार्यक्रमांचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शिर्डी दौऱ्यावर येत असून त्यांच्या हस्ते विविध विकासकामांचे शुभारंभ पार पडतील. अहमदनगरच्या आयुष रुग्णालयाचे देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ई-प्रणालीद्वारे लोकार्पण होईल.

देशाचे पंतप्रधान मोदी आज अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. जिल्ह्याच्या दौऱ्याची सुरुवात नरेंद्र मोदी साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेत करतील. गुजरातचे मुख्यमंत्री असताना 2008 साली आणि देशाचे पंतप्रधान झाल्यावर 2018 साली नरेंद्र मोदी शिर्डीत साईबाबांच्या दर्शनाला आलेले होते. त्यानंतर मोदी आज तिसऱ्यांदा साईबाबांच्या चरणी नतमस्तक होणार आहेत.  2018 मध्ये साईबाबांच्या समाधीचे शताब्दी वर्ष होते. या सोहळ्याची सांगता पं. नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेली होती. त्यावेळी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वातावरणकुलीत दर्शन रांग आणि शैक्षणिक संकुलाचे भूमिपूजन करण्यात आलेलं होतं. आज पाच वर्षांनी वातानुकूलित दर्शन रांगेचे लोकार्पण करण्यासाठी नरेंद्र मोदी शिर्डीत येत आहेत.

कसा असेल पंतप्रधान मोदींचा नगर दौरा? 

  1. पंतप्रधान मोदी दुपारी 1 वाजता शिर्डीत दाखल होतील
  2. त्यानंतर पंतप्रधान मोदी साईबाबा समाधी मंदिराचे दर्शन घेतील आणि पूजा करतील
  3. पंतप्रधान दुपारी 2 वाजता निळवंडे धरणाचे जलपूजन करणार
  4. यावेळी निळवंडे धरणाच्या कॅनलचे लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते केले जाईल
  5. पंतप्रधान मोदी दुपारी 3.15 वाजता विविध प्रकल्पांची पायाभरणी करतील
  6. सुमारे 7 हजार 500 कोटींच्या या प्रकल्पात आरोग्य, रेल्वे, रस्ते, तेल, गॅस क्षेत्रातील प्रकल्पांचा समावेश आहे
  7. या प्रकल्पांचे भूमीपूजन केल्यानंतर पंतप्रधान मोदी सायंकाळी 6.30 वाजता गोव्याला रवाना होतील

‘India’ नाही ‘भारत’! NCERT च्या पुस्तकात देशाचे नाव बदलणार

प्रस्तावित दौऱ्यानुसार, दुपारी एकच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी साई मंदिरात पोहोचणार आहे. साई मंदिरात पोहोचल्यानंतर नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पाद्यपूजा करण्यात येईल. त्याचबरोबर ‘शिर्डी माझे पंढरपूर’ ही छोटेखानी आरतीसुद्धा नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडणार आहे. यानंतर साईबाबा संस्थानच्या 2024 च्या डायरीचा प्रकाशन पंतप्रधानांच्या हस्ते केला जाईल. या ठिकाणाहून दर्शन घेतल्यानंतर ते अकोले तालुक्यातील निळवंडेकडे जलपूजन कार्यक्रमासाठी रवाना होणार आहेत.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here