PM Modi | देशातील राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्राच्या रामभूमीत दाखल होणार आहेत. दरम्यान, ह्या पार्श्वभूमीवर आता नाशिकमध्ये राजकीय हलचालींना वेग आल्याचे चित्र दिसत आहे. दरम्यान, १२ जानेवारी रोजी पंतप्रधान मोदी हे नाशिक मध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त ‘राष्ट्रीय युवक मेळावा’ नाशिक येथे आयोजित करण्यात आला आहे आणि या मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मार्गदर्शन करणार असल्याची माहिती समोर आली आहे.(PM Modi)
दरम्यान, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राज्याच्या आगामी लोकसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रचाराचा श्रीगणेशाही नाशिकमध्येच करणार असल्याचीही माहिती समोर आली आहे. यामुळे पंतप्रधान मोदींच्या ह्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या पोलिस व प्रशासकीय यंत्रणा सतर्क झालेली आहे. दरम्यान, ह्या महोत्सवाची जबाबदारी आता ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यावर सोपविण्यात आलेली आहे. सोबतच ह्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडूनही चाचपणी सुरू असून, या दिवशी होणाऱ्या राष्ट्रीय युवक मेळाव्यासाठी जागेचा देखील शोध सुरू आहे.
Sharad Pawar | शरद पवारांनी रणशिंग फुंकले; लोकसभेच्या ‘ह्या’ जागा लढवणार
दरम्यान, नाशिक नगरी ही महाराष्ट्राची धार्मिक राजधानी म्हटली जाते. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या तसेच मेळाव्यासाठी देशभरातून येणाऱ्या तरुण-तरुणींची होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता जिल्ह्यात जागेचा शोध घेतला जात आहे. यासाठी आता केंद्रीय पथक नाशिकमध्ये येऊन संबंधित जागेची चाचपणी करणार आहेत. सोबतच ह्या कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देखील उपस्थित राहणार आहे.(PM Modi)
नागपूर येथे होणाऱ्या काँग्रेसच्या “हैं तैयार हम” ह्या महारॅलीला मोदी हे आता नाशिकमधून उत्तर देणार आहेत. नाशिकच्या ह्या सभेतून भाजप राज्याच्या लोकसभा निवडणुकीच्या प्राचाराला सुरुवात करणार असल्याचीही शक्यता आहे. दरम्यान, मोदिंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणा सतर्क झाली असून कडेकोट बंदोबस्ताचे नियोजन केले जात आहे.(PM Modi)
Ajit Pawar | ‘दिलदार दादा’; अजित दादांचे प्रचारासाठी जिल्हाध्यक्षांना ‘मोठ्ठे’ गिफ्ट
धार्मिक नगरीतून श्रीगणेशा |(PM Modi)
राज्यातील आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने कंबर कसली असून, यासाठी भाजपने विशेष रणनीती देखील तयार केलेली आहे. तर, ह्या आगामी लोकसभा निवडणुकींमध्ये राज्यातील ४५ पेक्षा जास्त जागांवर वर्चस्व करण्याचा निर्धार भाजपने केलेला आहे. तर, भाजपकडून हिंदुत्वाचा मुद्दा अग्रेसर ठेऊनच ह्या निवडणूका लढवल्या जाणार असून, आतापासूनच त्यासाठी धार्मिक वातावरणाची निर्मिती केली जात आहे. त्यामुळे आता राज्यातील लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराचे नारळ हे राज्याच्या राम भूमीतूनच भाजप हे प्रचाराचा शुभारंभ करण्याचे नियोजन असून त्यासाठीच आता मोदींनी नाशिकची निवड केल्याचे दिसत आहे. (PM Modi)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम