PM Modi In Nashik | दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या उमेदवार भारती पवार आणि नाशिक लोकसभा मतदार संघाचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नाशिकच्या पिंपळगाव येथे जाहीर सभा होत आहे. या सभेत पंतप्रधान मोदी कांदा प्रश्नाला केंद्रस्थानी ठेऊन काय बोलणार..? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
सप्तशृंगी मातेला आणि नाशिकच्या प्रभू राम चंद्राला नमन करतो. काल काशीत मी बाबा विश्वनाथ आणि काळभैरव यांचे आशीर्वाद घेत नामांकन केले. तुमची सेवा हेच माझ्या आयुष्यातील सर्वात मोठे लक्ष्य आहे. तुम्ही मागच्या १० वर्षात माझे काम बघितले आहे. आज मी तुमच्याकडे आशीर्वाद मागण्यासाठी आलोय. तिसऱ्या कार्यकाळासाठी आणि विकसित भारत घडवण्यासाठी मी आज आशीर्वाद मागण्यासाठी आलोय.
मला बाळासाहेब ठाकरेंची आठवण येईल
इंडिया आघाडीचा मुख्य पक्ष कॉंग्रेस इतक्या वाईट पद्धतीने हरताय की त्यांच्यासाठी विरोधी बाकावर बसणेही कठीण आहे. त्यामुळे येथील नेत्यांनी निवडणूक संपल्यानंतर या छोट्या पक्षांनी कॉंग्रेसमध्ये विलीन व्हावे असे आव्हन केले आहे. म्हणजे त्यांनी आपापले दुकान बंद करावे. नकली शिवसेना नकली राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये विलीन झाल्यानंतर मला सगळ्यात जास्त आठवण बाळासाहेब ठाकरे यांची येईल.
कारण तेच म्हणाले होते की, “ज्या दिवशी मला वाटेल की शिवसेनेची कॉंग्रेस होतेय, मी शिवसेना समाप्त करेल. त्यामुळे आता नकली शिवसेनेचा अत्ता पत्ताही उरणार नाही. यांनी केलेला हा विनाश बाळासाहेबांना दुखी करत असेल. यांनी बाळासाहेबांच्या स्वप्नांचा चुराडा केला. बाळसाहेबांचे स्वप्न होते. राम मंदिर बनवणे, जम्मू काश्मीर मधून ३७० कलम रद्द व्हावा. हे झालं पण याचा सर्वात जास्त राग नकली शिसवेनेला आला.
कॉंग्रेसची अशी योजना
देशाच्या बजेटपैकी १५ टक्के केवळ मायनॉरिटीवर खर्च करायचा त्यांचा निर्धार. म्हणजे धर्माच्या आधारावर हे निधीचे वाटे करताय. आणि या कॉंग्रेससाठी मायनॉरिटी एकच आहे. ते म्हणजे त्यांचा आवडता वोट बँक.
ते गोरगरिबांचे आरक्षण हिसकावून ते मुस्लिमांना देण्याच्या तयारीत आहे.
PM Modi In Nashik | ही मोदीची गॅरंटी…
पण हा मोदी धर्माच्या आधारावर बजेट आणि आरक्षण वाटू देणार नाही. वंचितांचा अधिकार आहे आणि मोदी त्याचा चौकीदार आहे. ही निवडणूक फक्त खासदार नाहीतर पंतप्रधान निवडण्याची आहे. कोरोना काळात आरोग्य विभागात भारती पवार यांचा सेवाभाव कामी आला. भारतीजींच्या प्रयत्नातून नाशिकमध्ये ६०० आरोग्यमंदिर बनले. ८० टक्के सूट देत औषधे दिली जात आहेत. गर्भवती महिलांच्या खात्यात ६००० रुपये दिले जात आहेत. महाराष्ट्रातील रुग्णांना ५ लाखांपर्यंतचे उपचार मोफत दिले जातील, ही मोदीची गॅरंटी…
Nashik News | व्हाट्सअॅप ग्रुपच्या ॲडमिन्सलाही नोटिस; १५ शेतकरी आंदोलक ताब्यात
शेतकरी बांधव मला विसरणार नाही
शेतकऱ्यांनी माझे १० वर्षही बघितले आणि कॉंग्रेस राष्ट्रवादीचे सरकार बघितले. आज पीएम किसान सन्मान निधीतून ६००० रुपये येथील शेतकऱ्यांना मिळतात. येणाऱ्या पाच वर्षात ६०,००० रुपये प्रत्येक शेतकऱ्यांना मिळतील. आधी एक पैसा तरी मिळाला का..? मला माहितीय माझे शेतकरी बांधव मला कधीही विसरणार नाही. कारण मोदी नेहमी शेतकरी हिताला सर्वोपरी ठेवतो.
नाशिक जिल्हा हा कांदा आणि द्राक्ष शेतीसाठी प्रसिद्ध आहे. आमच्या सरकारने पहिल्यांदाच कांद्याचे बफर बनवले. आम्ही मागच्या काळात ७ लाख मेट्रिक टन कांदा खरेदी केली आणि आताही आणखी ५ लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करत आहोत. आमच्या काळात निर्यात ३५ टक्क्यांनी वाढली. १० दिवस आधीच कांदा निर्यात बंदी उठवण्यात आली. ३५ हजार मेट्रिक कांद्याची निर्यात झाली. सरकार कांद्याच्या निर्यातीवर अनुदानदेखील देणार आहे. आणि अशाच गॅरंटी पूर्ण करण्यासाठी दिंडोरीतून भारती ताई आणि नाशिमधून हेमंत गोडसेंना मत द्या आणि विजयी करा.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम