पिंपळगाव टोलनाका कायमस्वरूपी बंद करण्याची मनसेची मागणी

0
19
toll naka

नाशिक – गेल्या अनेक दिवसांपासून पिंपळगाव टोल नाक्यावरील वाढत्या घटनांमुळे हा टोलनाका कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी मनसेकडून करण्यात आली आहे.

मागील बऱ्याच दिवसांपासून वाहनचालक व टोलनाका कर्मचारी यांच्यात अनेकदा खटके उडालेत आहे. त्यातच कर्मचाऱ्यांनी थेट ग्रामीण पोलीस अधीक्षकांशीच गैरवर्तन केल्याची घटना ताजी असताना आता मागच्या आठवड्यात दोन महिलांमध्ये हाणामारी झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या अश्या घटनांमुळे वाहनचालकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. म्हणून पिंपळगाव-बसवंत टोकनाका कायमस्वरुपी बंद करावा, अशी मागणी मनसे पदाधिकार्‍यांनी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे केली आहे.

पिंपळगाव टोलनाका हा आता राज्यातला वादग्रस्त टोलनाका बनला आहे. या टोलनाक्यावर अशा घटना नेहमीचे असल्याचे इथल्या स्थानिकांचे म्हणणे आहे. तसेच इथले कर्मचारी नेहमीच वाहनचालकांशी अरेरावी करतात, तसा अनुभव आमच्या पदाधिकाऱ्यांनादेखील आलेला आहे.

घोटी ते चांदवड या अवघ्या ७० किमीच्या अंतरावर ३ टोलनाके असून याअगोदर आलेल्या गैरवर्तणुकीच्या तक्रारींची चौकशी करून हा टोलनाका येत्या ७ दिवसांत कायमस्वरुपी बंद करण्यात यावा. अन्यथा याविरोधात मनसेकडून तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल, अशा मागणीचे निवेदन मनसेच्या वतीने महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांना देण्यात आले आहे.

प्रस्तुत निवेदनावर मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष अ‍ॅड. रतनकुमार इचम, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, शहराध्यक्ष दिलीप दातीर, महिला प्रदेश उपाध्यक्षा सुजाता डेरे, जिल्हा उपाध्यक्ष मनोज घोडके, प्रदेश उपाध्यक्ष संदीप भवर, संघटक अतुल पाटील व आदि पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here