Deola | देवळा रोटरी क्लबच्या सहकार्याने मतदानाच्या दिवशी नागरिकांना मोफत वृक्ष वाटप

0
16
#image_title

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी: देवळा | सार्वत्रिक विधानसभा निवडणूकिसाठी (दि. २०) रोजी मतदान पार पडले. यासाठी देवळा नगरपंचायती मार्फत मोठ्या प्रमाणावर मतदान जनजागृती मोहीम राबविण्यात आली होती आणि त्याचा प्रभाव मतदानाच्या दिवशी दिसून आला.

Deola | निवाणे बारी घाटमाथ्यावरील दुर्गंधीने वाहनचालकांना मनस्ताप; योग्य ती कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशारा

देवळा रोटरी क्लबच्या सहकार्याने मोफत वृक्षाचे वाटप

त्याचाच एक भाग म्हणून देवळा नगरपंचायतद्वारे देवळा रोटरी क्लबच्या सहकार्याने मतदानाच्या दिवशी मतदान करणाऱ्या नागरिकांना मोफत वृक्षाचे वाटप करण्यात आले. यामध्ये रोटरी क्लबच्या वतीने वृक्षप्रेमी सुनील आहेर यांनी मोफत वृक्ष उपलब्ध करून दिले. देवळा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी प्रमोद ढोरजकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा अभिनव उपक्रम राबवण्यात आला.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here