पिंपळगाव मोर ते वासाळीपर्यंत रस्त्याच्या कामाचे खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते भुमीपुजन

0
39

राम शिंदे | सर्वतीर्थ टाकेद
दोन जिल्ह्यांना व पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाचा असलेला पिंपळगाव मोर ते शेंडीपर्यंत हा तेरा किलोमीटरचा रस्ता अत्यंत खराब झाला होता.गेल्या काही वर्षांपासून या रस्त्याचा पाठपुरावा सुरू होता. अखेर हा रस्ता राज्यशासनाच्या माध्यमातून जवळपास ९८ कोटींचा निधी मंजूर झाला असून लवकरच हे काम पूर्ण होईल असा विश्वास खासदार हेमंत गोडसे यांनी व्यक्त केला.

तसेच हा रस्ता राष्ट्रीय महामार्गाच्या तोडीचा बनवण्यात येणार आहे असे प्रतिपादन खासदार हेमंत गोडसे यांनी केले. पिंपळगांव मोर ते वासाळी, शेंडी (घोटी – कोल्हार)या रस्त्याच्या भुमीपुजन प्रसंगी ते बोलत होते.

या रस्त्या बरोबरच धामणी ते बोरीचीवाडी, अधरवड आघाण वस्ती, धामणगांव ते घोटी खुर्द रस्ता, भगूर वाहाळ स्लॅब ट्रेन व रस्ता, जुना बस स्टॉप ते बेलगांव रस्ता आदी कामांचे खासदार गोडसे यांच्या हस्ते उदघाटन झाले.
तालुक्यातील पिंपळगाव मोर ते वासाळी पर्यंत हा रस्ता अनेक वर्षापासुन खड्डेमय झाला होता. विशेष म्हणजे हा रस्ता कळसुबाई शिखर, भंडारदरा धरण, गडकिल्ले यासह अहमदनगर जिल्ह्याला जोडला आहे. या रस्त्यावर वर्षभर पर्यटकांची गर्दी असते. मात्र गेल्या पाच सहा वर्षापासुन या रस्त्यावर अनेक ठीकाणी एक फुटापर्यंत खड्डे पडून संपुर्ण रस्ता खड्डेमय झाला असल्यामुळे परिसराती ग्रामस्थांमध्ये व पर्यटकांमध्ये तीव्र नाराजी होती.

अखेर या परीसरातील ग्रामस्थांनी खासदार श्री.गोडसे यांच्याकडे रस्ता बनवावा असे साकडे घातले होते.अखेर ग्रामस्थांच्या मागणीला यश येऊन पिंपळगाव मोर ते वासाळी पर्यंत रस्त्याचे भुमीपुजन शनिवार ( ता.१२ रोजी ) खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी एकनाथ शिंदे गटाचे माजी आमदार काशिनाथ मेंगाळ, पांडुरंग गांगड, जिल्हा प्रमुख अनिल ढिकले, उपजिल्हा प्रमुख रघुनाथ तोकडे, तालुका प्रमुख संपतराव काळे, सदानंद नवले, विलास आडके, वसंतराव डामसे, समाधान वारुंगसे, देविदास जाधव, बाळा गव्हाणे, यासह नंदू गाढवे, दिलीप पोटकुले, शिवाजी काळे, साहेबराव बांबळे, देविदास देवगिरे, मुरलीधर गातवे, समाधान सुरुडे, संदीप भोसले, बंसी गाढवे, राहुल लगड, रमेश गायकर, सुनील गाढवे, बाळासाहेब गाढवे, सदाशिव काळे, कचरू आगविले, बाळू गाढवे, तानाजी गाढवे आदी उपस्थित होते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here