द पॉईंट नाऊ: ऑनलाइन औषध विक्रीला चालना मिळत असून, हा प्रकार पारंपरिक औषध विक्रेत्यांसाठी धोकादायक आहे. फार्मासिस्ट आणि रुग्ण यांच्यात ऋणानुबंध असतात. रुग्णांचा विश्वास असतो, त्याला तडा जाता कामा नये. हा प्रश्न सरकार दरबारी मांडण्यास आपण पुढाकार घेऊ, असे आश्वासन आमदार राहुल ढिकले यांनी दिले.
नाशिक जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन आणि श्री लोकसंकल्प केमिस्ट ग्रुप, नाशिकरोड यांच्या संयुक्त विद्यमाने’फार्मासिस्ट डे’ साजरा करण्यात ढिकले बोलत
आला. याप्रसंगी होते. व्यासपीठावर व्यापारी बँकेचे अध्यक्ष निवृत्ती अरिंगळे, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, ‘मविप्र’चे अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले, गोरख चौधरी, अरुण माळवे, औषध निरीक्षण सुरेश देशमुख, चंद्रकांत मोरे, प्रवीण हारक, नारायण वाजे, हिरालाल पाटील, अतुल दिवटे, अतुल अग्रवाल, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे, महेंद्र शहा, राजेंद्र धामणे उपस्थित होते. आयर्नमॅन डॉ. अरुण गचाळे यांनी स्पर्धेविषयी आपले अनुभव सांगितले.
ऑनलाइन औषध विक्रीने पारंपरिक औषध विक्री व्यवसायाचे भविष्यात नुकसान होईल. खासगी कंपन्या भांडवलदार या व्यवसायात उतरल्या आहेत. आम्ही सरकारच्या पाठिशी आहोत, सरकारनेही या संकटात आमच्या पाठिशी राहून ऑनलाइन औषध विक्री व्यवसायाचा बंदोबस्त करण्याची मागणी नाशिक जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन अध्यक्ष गोरख चौधरी यांनी यावेळी केली. फार्मासिस्ट व्यावसायिक यापूर्वीच्या मनपा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपच्याच पाठिशी होते, असे चौधरी म्हणाल्यानंतर व्यासपीठावरील राष्ट्रवादी आणि शिवसेना नेत्यांचे चेहरे पडले. कार्यक्रमास सर्वपक्षीय नेते हजर असल्याचे भान गोरख चौधरी यांना बोलताना न राहिल्याने उपस्थित फार्मासिस्ट व्यावसायिकांची पंचाईत झाली. मनपा निवडणुकीत माळवे आणि मंगेश पगार यांना भाजपने तिकीट देण्याची जाहीर मागणीही चौधरी यांनी सेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या उपस्थित केली.
करोनाकाळात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल डॉ. राजेंद्र जाधव, उपेंद्र दिनानी, डॉ. प्रवीण जाधव, डॉ. अमोल सुपे, डॉ. शिरीष घन, डॉ. किरण कुमावत, डॉ. अतुल अग्रवाल, डॉ. मनीष बोथरा, डॉ. धनंजय पेखळे, डॉ. समीर आहिरे यांचा सत्कार करण्यात आला. अद्ययावत फार्मसी पुरस्काराने सूर्या ड्रग हाऊस, अमित मेडिकल, पिंक फार्मसी, स्टार प्लस मेडिकल, पर्पल मेडी प्लस, श्री साई फार्मा ग्रीन फार्मसी, ग्रीन फार्मा मोर, सागर केमिस्ट यांना गौरविण्यात आले. कोव्हिडकाळात ट्रकचालकांना जेवण बनवून दिलेल्या महिला फार्मासिस्टचाही गौरव करण्यात आला. भाजप नाशिकरोड व्यापारी आघाडीचे अध्यक्ष मंगेश पगार, शिवाजी हांडोरे, डॉ. काजल माळवे, दिगंबर शहाणे, अंबादास शिंदे यांचाही सन्मान करण्यात आला.
फार्मासिस्टचे योगदान समाजापुढे यावे या उद्देशाने फार्मासिस्ट डे साजरा केला जातो. कोव्हिडीवर औषध, लस निर्मिती करणाऱ्या फार्मासिस्टला कोव्हिड योद्धा म्हणून शासनाने गौरविले नाही, याबद्दल अध्यक्ष योगेश बागरेचा यांनी खंत व्यक्त केली. आता आपल्या व्यवसायावर कॉर्पोरेट कंपन्यांचे संकट येत आहे. हे वर्चस्व मोडित काढण्यासाठी ऐक्य टिकविण्याचे आवाहनही त्यांनी केले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम