भिकन शेख, पेठ प्रतिनिधी: एमआयटी राष्ट्रीय सरपंच संसद तालुका सरपंच संसद उपक्रमांतर्गत पेठ तालुक्यात मंगळवार सहा डिसेंबर रोजी सकाळी दहा ते दुपारी साडेबारा या वेळेत दादासाहेब गायकवाड सभागृह पेठ येथे भव्य सरपंच संसदेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती राष्ट्रीय सरपंच संसदेचे प्रमुख समन्वयक योगेश पाटील , सहसमन्वयक प्रकाश महाले यांनी दिली.
या तालुका सरपंच संसदेस दिंडोरी पेठ उपविभागीय अधिकारी गणेश मिसाळ, पेठचे तहसीलदार संदीप भोसले, पेठ पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी नम्रता जगताप हे सरपंच यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधणार आहेत. या सरपंच संसदेला पेठ तालुक्यातील सर्व सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्यांना आमंत्रण देण्यात येणार असून या सरपंच संसद उपक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम