पेठ हादरले ! बेवारस नवजात बालक बसस्थानक परीसरात सापडले

0
43

भिकन शेख | पेठ प्रतिनिधी

पेठ एसटी डेपो शेजारी परिसरात एक नवजात बालक बेवारस स्थितीत आढळून आले. एसटी डेपो परिसरात दुपारी दोन वाजेच्या सुमारास काही कर्मचाऱ्यांना झुडूपामध्ये हे नवजात बालक दिसले.

पेठ शहरातील चेतन खेकाळे, गणेश वाडकर तसेच नागरिकांनी या बालकास तत्काळ ग्रामीण रुग्णालय पेठ येथे दाखल केले. ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी बाळाची तपासणी करून प्रकृती चांगली असल्याचे सांगितले. हे बाळ स्री जातीचे असून बाळाचे वजन २ किलो १०० ग्रॅम आहे.

या बाळाची प्रसुती ही रुग्णालयात झाली असावी अशी शक्यता वर्तवली जात आहे अशा गोंडस नवजात बालकाला बेवारस स्थितीत आढळल्याने शहरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here