भिकण शेख| पेठ प्रतिनिधी : पेट्रोल पंपाजवळ वळणावर मोटरसायकल आणि ट्रक यांच्यात समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला असून त्यात मोटरसायकलस्वार तुषार माळगावे याचा जागीच मृत्यू झाला आहे.
पेठ नासिक राष्ट्रीय महामार्गावर दिवसेंदिवस अपघाताची मालिका सुरूच असून नाशिक हुन पेठकडे येणारा ट्रक एम एच झिरो इ बी 9277 आणि पेठकडून नाशिककडे जाणारी मोटरसायकल क्रमांक एम एच 15 एचपी 9781 यांच्यात पेट्रोलपंपाशेजारी वळणावर समोरासमोर धडक झाली त्यात मोटरसायकलस्वार तुषार मोहन माळगावे (रा. गोंदे ता. पेठ) याचा जागीच मृत्यू झाला असून ललित रामचंद्र गवळी (रा. धाब्याचा पाडा ता. पेठ) हा गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आले आहे याप्रकरणी पेठ पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम