Pankaja Munde | दसऱ्यानिमित्त दरवर्षीप्रमाणे सावरगाव येथील भगवानगडावर पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा कार्यक्रम पार पडला. यावर्षीच्या लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंना बीड लोकसभा मतदारसंघात जातीय संघर्षामुळे पराभवाचा सामना करावा लागला. या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने भाषण करत असताना पंकजा मुंडेंनी बीड जिल्ह्यात टोकाला जात असलेल्या जातीय संघर्षावर भाष्य करत “हा असा समाज घडवण्यासाठी आयुष्यातील 22 वर्षे खपवली नाहीत.” असं म्हणत त्यांनी आपली खंत व्यक्त केली.
Pankaja Munde | दसरा मेळाव्या आधीच पंकजा मुंडेंचे मनोज जरांगेंच्या मेळाव्याविषयी मोठे वक्तव्य
दसरा मेळावाच्या भाषणात काय म्हणाल्या पंकजा मुंडे?
दसरा मेळाव्याच्या भाषणात पंकजा मुंडेंनी पंकजा मुंडे थापा मारते का? पंकजा मुंडे खोटे बोलते का? पंकजा मुंडे समोर एक बोलून दुसरे वागते का? कुणाला घाबरते का? अंधारात कोणाला जाऊन भेटते का? मी कोणालाच घाबरत नाही. घाबरते ते समोरच्या मैदानात माझं भाषण ऐकायला लोक आलेच नाही त्या दिवसाला. मी भगवान बाबांना प्रार्थना करेन की असा दिवस उजाडू सुद्धा नये.” असे म्हणत त्यांनी आपली किती बोलून दाखवली.
कधीच भेदभाव केला नाही
बीडमधील लोकसभेच्या निकालाबद्दल बोलताना पंकजा मुंडेंनी “या बीड जिल्ह्यातील गरीब माणसांचे भलं करण्यासाठी मी काम केलं आहे. एकही गाव सोडले नाहीये. कमी मतदान झालेले गाव असो वा जास्त मतदान झालेले प्रत्येकाला समान निधी दिलाय. कधीही भेदभाव केला नाही, मात्र यावेळी गडबड झाली. असो आपल्याला ही गडबड पुसून काढायची आहे.” असे त्या यावेळी म्हणाल्या.
जातीवर जाणाऱ्यांची साथ द्यायची नाही
आपल्या राज्यातील प्रत्येक जातीच्या माणसाला विश्वास वाटावा असे गोपीनाथ मुंडेंचे नेतृत्व होते. छत्रपतींच्या घराण्याने देखील मुंडे साहेबांवर प्रेम केलंय. आज समाजाला झालंय काय? एखाद्याला गाडीने उडवलं तर लोक विचारतात की गाडीच्या ड्रायव्हरची जात काय आणि उडवलेल्याची जात काय? एखाद्या नराधमाने एका लहान एखाद्या चिमुरडीवर अत्याचार करत जीव घेतला, तर लोक विचारतात त्या मुलीची जात काय आणि त्या अत्याचार करणाऱ्याची जात काय? हा असा समाज घडवण्यासाठी आम्ही आयुष्यातली वीस वर्ष वाया घालवली नाहीत. असा समाजा मला घडवायचा नाही. आम्हाला अधिकाऱ्याचा सीआर बघून काम द्यायचंय, जात पाहून काम देणारी गोपीनाथ मुंडे यांची अवलाद नाही. आम्हाला काम करणाऱ्या माणसाच्या पाठीमागे उभे राहायचे आहे. उगीच जातीवर स्वार होत कुणालाही पाठिंबा द्यायचा नाही.” असं म्हणत पंकजा मुंडेंनी विरोधकांवर नाव न घेता निशाणा साधला.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम