Sushama Andhare | शिवाजी पार्कवर शिवसेना ठाकरे गटाच्या पारंपरिक दसरा मेळाव्याला सुरुवात झाली असून या मेळाव्याच्या सुरुवातीला शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी भाषणाला दणक्यात सुरुवात केली आहे. यावेळी बोलत असताना सुषमा अंधारे यांनी भाजपसह देवेंद्र फडणवीस आणि आरएसएसवर टीका करत, “देवेंद्र फडणवीस यांचे कान उपटा. त्यांना सांगा महाराष्ट्र शांत हवा आहे. इथे सांप्रदायिक विभाजन करू नये.” अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला.
Sushma Andhare | त्यांनी बोलताना डोळ्याला झेंडूबाम लावावा; अंधारेंचा घणाघात
“सरसंघचालक जी तुमचं म्हणणं सर ऑंखो पर”
आज विजयादशमी निमित्ताने राज्यभरात सर्वत्र दसरा मेळावे साजरे केले जात आहेत. सकाळी संघाचा मेळावा पार पडला यावेळी मोहन भागवतांनी द्वेष संपला पाहिजे. सांप्रदायिक विभाजन होता कामा नये. देश मजबूत झाला पाहिजे. दुर्बल घटकांना सोबत घेतलं पाहिजे. असे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावर भाष्य करत सुषमा अंधारे यांनी यावेळी “स्वरसंघचालक जी तुमचं म्हणणं सर ऑंखो पर, परंतु तुम्ही हे सांगताय कोणाला? विविध जातीचे लोक गुण्यागोविंदाने नांदतात. द्वेषबुद्धी संपवण्याचा सल्ला द्यायचाच असेल, तर तो सर्वात आधी देवेंद्र फडणवीस यांना द्यावा. आमची हात जोडून विनंती आहे. ज्यांनी माणसात माणूस ठेवला नाही, जातीत जात ठेवली नाही. कोकणात न चालणारी चिल्लर 4 आणे 12 आणे बाजारातून रद्दबाद झालीये. अशी चिल्लर तुम्ही आणत आहात. तर देवेंद्र फडणवीस यांचे कान उघडा. त्यांना सांगा महाराष्ट्रात शांतता हवी आहे. इथे सांप्रदायिक विभाजन करू नये, आधी 4 आणे 12 आणे चिल्लर मुस्लिम द्वेष करत होती. आम्ही हिंदूंचं अभिनंदन करतो. त्यांनी कमालीचा संयम दाखवला असून कवडीची किंमत दाखवली नाही. आता त्यांनी दुसरा खेळ सुरू केला आहे. हिंदू-मुस्लिम कार्ड चालत नाही. म्हटल्यावर, मराठा आणि ओबीसी कार्ड खेळला जातोय.” असं म्हणत सुषमा अंधारे यांनी फडणवीसांवर सडकून टीका केली.
राजभाऊ तुम्ही अजून दोन पत्र लिहा…! सुषमा अंधारेंची राज ठाकरेंकडे मागणी
अंधारेंचा शिंदे-फडणवीसांवर निशाणा
देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे जातीत भेद निर्माण करीत आहेत. कारण लोकांमध्ये गेल्यावर लोकप्रश्न विचारतील याची त्यांना भीती वाटते. या प्रश्नांची उत्तरे त्यांच्याकडे नाहीत, म्हणून ते राजकारण करतात आपण त्यांना काही विचारलं तर सांगतात यावर राजकारण करू नये, हे बोलू नका, ते बोलू नका, राजकारण करतय कोण? त्यांनी कोणती कामे केलीत.” असा सवाल करत शिंदे फडणवीसनवर टीकास्त्र सोडले. गावात रस्ते नाही, गटार नाही, मीटर नाही मग तुमचे हजारो कोटी गेले कुठे? किती खोटं बोलाल. खोटे आकडे द्याल. सोयाबीन वर बोलत नाही, शेतीमालावर बोलत नाहीत ते जातीपातीच्या प्रश्नावर बोलतात पण आर्थिक प्रश्नावर बोलत नाहीत. असे म्हणत सत्ताधारी पक्षावर सडकून टीका केली.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम