Pankaja Munde | पंकजा मुंडेंच्या अडचणी संपेना..; आता काय आहे प्रकरण..?

0
46
Pankaja Munde
Pankaja Munde

Pankaja Munde |  भाजपमध्ये सध्या अनेक राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. अशातच आता भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे दिसत आहे. पंकजा मुंडे यांच्या मालकीच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला पुन्हा एकडा नोटिस ठोठावण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला १९ कोटी रुपयांचा साखरेवरील जीएसटी न भरल्यामुळे नोटीस पाठवण्यात आली होती. त्यावेळी पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी बीडमधील गावागावात जाऊन पैसा गोळा केले होते. दरम्यान, आता पुन्हा या कारखान्याला नोटीस बाजावण्यात आली आहे.(Pankaja Munde)

भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्यावरील संकटे ही संपण्याच नावच घेत नाहीये. दुसऱ्यांदा त्यांच्या साखर कारखान्याला नोटिस बजावण्यात आली आहे. गेल्यावेळी त्यांचे कार्यकर्ते हे त्यांच्या मदतीला धावले होते. आणि त्यांनी गावागावातून पैसा गोळा केले होते तर, काहींनी धनादेशही पाठवले आहेत. दरम्यान, कार्यकर्त्यांच्या आणि जनतेच्या या प्रेमामुळे पंकजा मुंडे या भारावून गेल्या होत्या. त्यांनी सोशल मिडियावर एक व्हिडीओ ट्विट करत सर्व कार्यकर्त्यांचे आणि समर्थकांचे आभार मानले होते.(Pankaja Munde)

Maratha Reservation | सरकारला मराठ्यांचा धाक; शिवजयंतीबाबत मोठा निर्णय

माझा स्वाभिमान मला ते करू देत नाही

यात त्या म्हणाल्या की,”आता मला आर्थिक मदत नको. तुमचे प्रेम असेच कायम राहू द्या, तुमचे प्रेम आणि आशिर्वाद माझ्या राजकीय आणि सामाजिक जीवनातील अकाऊंटमध्ये जमा करा. मला आता तेच आवश्यक आहे. तुमच्याकडून कुठलीही रक्कम घेणं हे मला पटत नाहीये. माझा स्वाभिमान मला ते करू देत नाहीये. त्यामुळे त्या रकमा ह्या घरी ठेवा व तुमचं प्रेम माझ्या अकाऊंटमध्ये जमा करा, असे भावनिक आवाहन त्यांनी केले होते. या प्रकरणाला आता अगदी काहीच काहीच महिने लोटले असतील की, आता पुन्हा त्यांना नोटीस आली असून, पुन्हा मुंडेंसमोरील आव्हाने वाढली आहेत.(Pankaja Munde)

Pankaja Munde | नेमकं प्रकरण काय..?

भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या मालकीच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याकडून त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीची (पीएफ) ६१ लाख ४७ हजार रुपये थकवले असल्या प्रकरणी ही नोटिस बजावण्यात आली आहे. तर, ही थकीत रक्कम न भरल्यामुळे काल कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीएफ कार्यालयाकडून त्यांच्या वैद्यनाथ कारखान्याला नोटीस बजावण्यात आली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून वेगवेगळ्या कारणांमुळे वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना हा बंद आहे. तर, साखर कारखान्याने कर्मचाऱ्यांच्या पीएफची रक्कम ही कार्यालयाकडे जमा केली नसल्याने त्यांना ही रक्कम भरण्याबाबतची नोटिस ठोठावण्यात आली आहे.(Pankaja Munde)

Nilesh Rane | टिका करणे राणेंना भोवले; ठाकरेंच्या कार्यकर्त्यांकडून तूफान दगडफेक

म्हणून कारखाना बंद… 

पंकजा मुंडे या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन पदावर कार्यरत आहेत. दरम्यान, हा कारखाना काही महिन्यांपासून बंद असून, कर्मचाऱ्यांच्या पीएफची रक्कम संबंधित कार्यालयाकडे न भरल्यामुळे त्यांना पीएफ कार्यालयाकडून या कारखान्याच्या व्यवस्थापनाला नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच, हा कारखाना गेल्या अनेक महिन्यांपासून दुष्काळी स्थिती या सोबतच अनेक कारणांमुळे बंद असून, यामुळे बंद असलेल्या या कारखान्याच्या कर्मचाऱ्यांचा पीएफचा निधी हा कार्यालयाकडे भरला नाही.(Pankaja Munde)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here