पनीर प्रेमींनो सावधान बनावट पनीर बाजारात; नाशिक शहरात 12 लाखांचे बनावट पनीर जप्त

0
35

नाशिक: शहर सध्या वेगवेगळ्या कारवाईने चर्चेत आहे. शहरात आज दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून अन्न व औषध प्रशासनाने (FDI) टाकलेल्या धाडीत 12 लाखांचे बनावट पनीर व भेसळकारी पदार्थ जप्त केलेत, यामुळे पनीर प्रेमींची चांगलीच झोप उडाली आहे.

गेल्या काही दिवसापासून अन्न व औषध प्रशासन विभागाने सणासुदीच्या दृष्टीने मोहिम सुरु केलेली असून अनेक ठिकाणी झाडाझडती करण्यात आली आहे. याचाच भाग म्हणून दुध व दुग्धजन्य पदार्थ, मिठाई, खाद्यतेल उत्पादक, रिपॅक व घाऊक विक्रेते यांच्यावर प्रशासनामार्फत लक्ष ठेवण्यात आले होते त्यातच आज नाशिक जिल्ह्याभरात कारवाया करण्यात आली.

बुधवारी (दि.24) अन्न सुरक्षा अधिकारी प्रमोद पाटील, बी अ. रासकर, एस. के. पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे शहरातील मधुर डेअरी अ‍ॅण्ड डेलीनिडस् अंबड या आस्थापनेवर धाड टाकून कारवाई करण्यात आली.

याठिकाणी अप्पासाहेब हरी घुले (39 वर्षे) इसम नमूद आस्थापनेचा विक्रेता म्हणून हजर होता. अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 अंतर्गत परवाना आढळून आला नाही. तरी आस्थापनेत विनापरवाना बनावट पनीर व तुपाच्या विक्रीसाठी उत्पादन तयार करीत असल्याचे आढळले. सदरचे पनीर हे रिफाइंड पामोलीन तेलाचा वापर करुन बनावटरित्या तयार करत असताना आढळून आले.

कारखान्यात तयार झालेले पनीर व तूप हे अन्न सुरक्षा व मान 2006 मध्ये नमूद तरतुदीनुसार तयार केले जात नाहीत. यावरून विक्रेता घुलेे यांनी अन्न सुरक्षा व मानके 2006 अंतर्गत वैध परवाना त्यांच्या उत्पादनाच्या जागेसाठी धारण केलेले नसल्यामुळे त्यांच्याकडील पनीर, अँसिटीक अ‍ॅसीड, रिफाइड पामोलीन तेल आणि तूप यांचा एकूण 2 लाख 35 हजार 796 रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे. ले

अन्न सुरक्षा अधिकारी डीडी ताबोळी, गुप्तवार्ता विभागाचे अ. र. दाभाडे, गो वि कासार यांच्या पथकाने आनंद डेअरी फार्म, म्हसरुळ या ठिकाणी धाड टाकली. तसेच आनंद वर्मा (50) या व्यक्तीस विचारपुस केली असता विक्रीसाठी तयार केलेले पनीर हे बनावट दूध पावडर व खाद्यतेलाचा वापर करून तयार केलेले असल्याचे सांगितले.

रिफाईड पाम तेलाचा साठा उपलब्ध असल्याने सदरचे पनीरचा नमुना तसेच भेसळकारी पदार्थ यांचे नमुने घेवुन त्यांचा एकूण 9 लाख 67 हजार 315 रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला असून दोन्ही कारखाने सिल करण्यात आलेले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here