पंचवटी खून प्रकरणातील आरोपींना अवघ्या तीन तासांतच अटक

0
9

नाशिक – शनिवारी (दि.१०) घडलेल्या एका तरुणाच्या खूनप्रकरणी दोन संशयित आरोपींना पकडण्यास पोलिसांना यश आले. अवघ्या तीन तासांतच ह्या आरोपींना बेड्या ठोकण्याची कामगिरी पंचवटी पोलिसांनी केली आहे.

शनिवारी रात्रीच्या सुमारास दिंडोरी रोडवर एका तरुणावर रिक्षातून आलेल्या दोन आरोपींनी धारदार शस्त्राने वार करत त्याचा खून केला आणि ते फरार झाले. यानंतर पंचवटी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि अवघ्या तीन तासात आरोपींना पकडण्यास यश आले. किरण रमेश कोकाटे व राहुल गवारे अशी अटक करण्यात आलेल्या हल्लेखोर संशयितांची नावे आहेत. न्यायालयाने ह्या दोघांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवी सय्यद हा तरुण शनिवारी रात्रीच्या सुमारास कालिकानगर येथून आपल्या घरी पायी जात असताना त्यावेळी संशयित किरण रमेश कोकाटे आणि राहुल गवारे यांनी रिक्षेतून येत रवीवर धारदार शस्त्राने वार करत त्याला ठार केले, आणि तेथून ते रिक्षासह पसार झाले. दरम्यान, रवीचा रुग्णालयात दाखल करतानाच त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी रवीच्या नातेवाईकांनी पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी त्या दोघांवर खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.

घटनेची माहिती मिळताच विशेष पोलीस महानिरिक्षक तथा अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. बी. जी. शेखर पाटील, पोलीस उपआयुक्त अमोल तांबे, गुन्हे शाखेचे उपआयुक्त संजय बारकुंड, सहायक पोलीस आयुक्त गंगाधर सोनवणे यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी पंचवटीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सिताराम कोल्हे व इतर निरीक्षकांना आरोपींचा शोध घेऊन तात्काळ अटक करण्याबाबत मार्गदर्शक सूचना दिल्या. त्यानुसार पंचवटी, म्हसरूळ, आडगाव येथील गुन्हे शोध पथके तयार केली व त्या संशयिताचा शोध घेण्यासाठी पथके रवाना केलीत.

यावेळी पोलिसांनी तांत्रिक व मानवी कौशल्याचा वापर करून संशयित किरण कोकाटे व त्याचा मित्र राहुल गवारे यास अंबडहून अवघ्या तीन तासात अटक करण्यात आली. जुन्या भांडणाच्या कारणावरून रवीचा खून केला असल्याचे चौकशीत उघड झाले. संशयितांना रविवारी (दि.११) विशेष न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांना १५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

 


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here