नाशिक : जिल्ह्यात निवडणुकांचा माहोल असून जिल्ह्यातील अनुसूचित व बिगर अनुसूचित क्षेत्रात येणाऱ्या १५ पंचायत समित्यांच्या सभापती पदाचे आरक्षण (Reservation of Chairmanship) आज रोजी सोडत पद्धतीने जाहीर करण्यात आले. यामुळे इच्छुकांनी कंबर कसली असून सर्व्यांचे लक्ष निवडणुकीच्या तारखेकडे लागून आहे.
देवळा तालुक्यातील आरक्षण काय निघते याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. मात्र आरक्षण अनुसुचित जमाती (महिला) निघाल्याने अनेकांचा हिरमोड झाला आहे. आरक्षण निघाल्यानंतर पुढील राजकीय नेत्यांची दिशा ठरणार असून या जागेसाठी तालुक्यात मात्र चढाओढ निर्माण होणार आहे.
आज रोजी सोडत पद्धतीने आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. ते पुढील प्रमाणे,
अनुसुचित जमाती – कळवण, सुरगाणा
अनुसुचित जमाती (महिला) – पेठ, त्र्यंबकेश्वर
———
अंशत: अनुसूचित क्षेत्रातील
अनुसुचित जमाती (महिला) – दिंडोरी
———-
अनुसूचित क्षेत्राबाहेरील पंचायत समित्यांसाठी निघालेले आरक्षण पंचायत समितीचे नांव
अनुसुचित जाती (महिला) – इगतपुरी
अनुसुचित जमाती – चांदवड
अनुसुचित जमाती (महिला) – नाशिक, देवळा
नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) – बागलाण
सर्वसाधारण महिला – सिन्नर, येवला, मालेगांव
सर्वसाधारण – निफाड, नांदगांव
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम