Onian farmer strike: कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन मागे; पालकमंत्री दादाजी भुसे यांची शिष्टाई यशस्वी

0
14

Onian farmer strike  : कांदा उत्पादक शेतकरी ठिकठिकाणी आंदोलन करत आहे. कांद्याला भाव नसल्याने शेतकरी संतप्त झाले. सकाळपासून कांदा उत्पादक शेतकरी विविध मागण्या घेवून आंदोलनास बसले होते. शेतकऱ्यांनी आक्रमक होत लासलगाव कांदा लिलाव बंद पाडले. या आंदोलनाची दखल घेत पालकमंत्री थेट आंदोलन स्थळी पोहचले व आंदोलक शेतकऱ्यांची चर्चा करून त्यांचे म्हणणे ऐकून घेत येत्या आठ दिवसांत बैठकीचे आश्र्वासन देत शेतकऱ्यांना दिलासा दिला पालकमंत्र्यांची तत्परता बघून शेतकऱ्यांनी विश्वास ठेवत आंदोलन मागे (onian farmer strike) घेतले.

Onian farmer: खबरदार शेतकऱ्यांना हलक्यात घ्याल तर; कांदा आंदोलक संतापला लासलगाव लिलाव पाडले बंद

पालकमंत्री भुसे म्हणाले की येत्या आठवड्याभरात मुख्यमंत्री व कृषिमंत्री यांच्यासोबत शेतकऱ्यांच्या शिष्ट मंडळा सोबत बैठक घेवून शेतकऱ्यांच्या मागण्या सकारात्मकपणे मांडू. शेतकऱ्याचा मुलगा म्हणून मला सर्व परिस्थितीची जाणीव असून लवकरात लवकर कांद्याचे दर सुस्थितीत कसे येथील आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. यावेळी कांदा उत्पादक संघटनेचे भारत दिघोळे यांनी आपल्या मागण्या पालकमंत्री भुसे यांच्यासमोर व्यक्त करत शेतकऱ्यांच्या तीव्र भावना व्यक्त केल्या. यावेळी संघटनेचे भगवान जाधव तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या…
महाराष्ट्रातील सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने महाराष्ट्र सरकार व केंद्र सरकारकडे ‘खालील काही प्रमुख मागण्या केल्या आहेत.

१) महाराष्ट्र सरकारने स्वतंत्र कांदा महामंडळ स्थापन करावे आणि त्यासाठी ५ हजार कोटी रुपयांची तरतूद करावी.

२) कोणत्याही अटी शर्ती शिवाय जानेवारी २०२२ पासून विक्री केलेल्या कांद्याला सरसकट १५०० रुपये अनुदान द्यावे.

(३) नाफेडच्या माध्यमातून खरेदी करण्यात येणार असलेल्या कांद्याला ३० रुपये प्रति किलो दर द्यावा.

(४) जास्तीत जास्त कांदा निर्यात होण्यासाठी कायमस्वरूपी कांदा निर्यात धोरण तयार करावे.

(५) कांद्याला कवडीमोल दर मिळाल्यामुळे शेतकरी कर्जाची परतफेड करु शकत नाही म्हणून संपूर्ण पीक कर्ज १००% माफ करावे.

६) राज्यातील प्रमुख कांदा उत्पादक जिल्ह्यांमध्ये सरकारने कांदा प्रक्रिया उद्योग सुरू करावेत.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here