द पॉईंट नाऊ: घराची स्वच्छता, कामाने दरवर्षी दिवाळीच्या तयारीला सुरुवात होते. अवघ्या दोन आठवड्यांवर दिवाळी येऊन ठेपल्याने सध्या अनेक घरांमध्ये रंगकामाची लगबग सुरू आहे. गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात कंपन्यांनी रंगाच्या दरात वाढ केली आहे. मागील वर्षी दिवाळी होऊन गेल्यानंतर ही वाढ झाल्याने त्याचा फारसा परिणाम जाणवला नसला तरी यंदा रंगरंगोटीच्या खर्चात वीस ते पंचवीस टक्के वाढ झाली आहे.
दिवाळीच्या सणाला २१ ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. त्यामुळे सर्वच जण तयारीला लागले आहेत. सगळीकडे घरातील साफसफाई, रंगरंगोटीची कामे सुरू आहेत. मात्र, या रंगकामाला आता वाढत्या महागाईचा फटका बसत आहे. महागाईच्या काळात सर्वसामान्य माणूस आधीच हैराण असताना आता घराच्या रंगरंगोटी च्या कामांसाठी वाढीव रक्कम मोजावी लागत आहे. नोव्हेंबर २०२१ मध्ये रंग उत्पादक कंपन्यांनी रंगाच्या किमती वाढ केली आहे. हा निर्णय मागील वर्षीच झाला असला तरी त्यावेळी दिवाळीचा सण होऊन गेलेला असल्याने सर्वसामान्यांना दरवाढीची फारशी जाणीव झाली नाही. बांधकाम व्यावसायिकांना मात्र त्याचा वर्षभर फटका बसत आहे. रंग उत्पादक कंपन्यांनी त्यावेळी रंगांच्या दरात ७ ते १२ टक्के वाढ केली. २००८ नंतर केलेली ही सर्वाधिक दरवाढ आहे. या दरवाढीबरोबर रंगकाम करणाऱ्या कामगारांनी मजुरीत वाढ केल्याने दोन वर्षांच्या तुलनेत घराचे रंगकाम करण्याचा खर्च वीस ते पंचवीस टक्क्यांनी वाढला असल्याचे व्यावसायिकांकडून सांगितले जात आहे.
इकोफ्रेंडली ट्रेंड
गत काही वर्षांत रंगांच्या बाजारातही इफोफ्रेंडली ट्रेंड पुढे येत आहे. त्यानुसार रंग बाजारात येत त्यास ग्राहकांकडूनदेखील पसंती दिली जात आहे. टर्पेटाइन, रॉकेल यांच्या मिश्रणापासून तयार होणाऱ्या रंगाला उग्र वास असतो या रंगास उग्र वास नसतो, तसेच तो पाण्यात मिसळून दिला जातो.
रंग कंपन्यांनी रंगांच्या दरात केलेली वाढ, वाहतूक खर्च, रंगकाम करणाच्या मजुरांचा रोजगार आदी कारणांमुळे घराच्या रंगकामाच्या खर्चात वीस ते पंचवीस टक्के वाढ झाली आहे. मात्र, दोन वर्षे कोरोना काळात अनेकांनी घराचे रंगकाम मागे टाकल्याने यंदा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
– रंग कामगार
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम