ओली पार्टी करणारे पोलीस निलंबित ; नागरिकांनी केले कारवाईचे स्वागत

0
18

नाशिक प्रतिनिधी : नाशिक शहरात काल ओली पार्टी पोलीस चौकीत रंगल्याचे समोर येताच शहरात खळबळ उडाली. शहर पोलिसांच्या गंगापूर रोडवरील एका पोलीस चौकीत ओली पार्टी रंगल्याचा व्हिडीओ काल समोर आला आहे. पोलीस चौकीतच मद्यधुंद पोलीस पार्टी करत असताना स्थानिक नागरिकांनी रंगेहाथ या पोलिसांनाच बघितले होते.

हा व्हिडीओ सोशीलमीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांच्या निर्णयाकडे सबंध नाशिककरांचे लक्ष लागून होते. दरम्यान, आयुक्तांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तत्काळ चार पोलिसांना निलंबित केले आहे. यामुळे पोलिसांना चांगलाच दणका मिळाला आहे.

याबाबतची माहिती माध्यमांना देत असताना आयुक्त म्हणाले की, शहरातील पोलीस ठाण्यांच्या धर्तीवर पोलीसा चौक्याही अद्यायावत करणार आहोत. चौकीत सीसीटीव्ही कॅमेरे असतील असेही ते म्हणाले आहेत.

गंगापूर रोडवरील दादोजी कोंडदेव नगर परिसरात प्रेमी युगुलांचे चाळे नियमित सुरु असतात. याबाबतची तक्रार देण्यासाठी काही नागरिक पोलीस चौकीवर गेले होते. या नागरिकांनी पोलीस मद्यधुंद अवस्थेत असल्याचे पहिले. टेबलवर दारूचे भरलेले ग्लास दिसले. हा सर्व प्रकार एका नागरिकाने मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पोलिसांनी या नागरिकांसोबत वाद घालत धक्काबुक्की आणि मारहाण केली.

या प्रकारची माहिती परिसरात समजल्याने गंगापूर पोलीस ठाण्यात स्थानिकांचा मोठा जमाव जमला होता. यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन दोषी पोलिसांवर कारवाई करण्याचे आश्वासन स्थानिकांना दिले होते. यानंतर रात्री उशिरा नागरिक पोलीस ठाण्यातून माघारी फिरले होते.

आयुक्तांनी आज सकाळी या प्रकरणाची गंभीर दखल घेत दीपक पांडेय यांनी तात्काळ दोषी आढळलेल्या चारही पोलिसांना निलंबित केले आहे.

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here