OBC राजकीय आरक्षणाबाबत काँग्रेस OBC सेलचे समर्पित आयोगास निवेदन

0
64

रोहित गुरव

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी (नाशिक) : न्यायालयाने महाराष्ट्रात OBC प्रवर्गाचे राजकीय आरक्षण रद्द केल्याने राजकीय गोटात मोठी चलबिचल सुरू आहे. याबाबतच नुकतेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गाला आरक्षण देण्याच्या मागणिबाबत नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयात महाराष्ट्र राज्य समर्पित आयोगाचे सदस्य जयकुमार भाटिया यांना काँग्रेसच्या OBC विभागाद्वारे निवेदन देण्यात आले.

महाराष्ट्र राज्यात OBC प्रवर्गाचे राजकीय आरक्षण न्यायालयाने रद्द केले आहे. राज्य सरकारने याबाबत सादर केलेले इम्पिरीअल डेटा न्यायालयाने नाकारला होता. हे आरक्षण मिळायलाच हवे अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

OBC आरक्षण राहिले तरच ओबीसींना राजकीय प्रतिनिधित्व मिळेल, असे मत या निवेदनातून व्यक्त करण्यात आले आहे. या निवेदनात जुन्या अनेक बाबींचा दाखला देत, आरक्षणाची मागणी करण्यात आली आहे.

मध्य प्रदेशात OBC राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे विरोधी पक्षांनी सत्ताधारी पक्षाला धारेवर धरले आहे. तर यामुळे सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी मधील घटक पक्षांमध्येच चलबिचल सुरू असल्याचे बोलले जात आहे.

आता लवकरात लवकर निवडणूका घेण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. यामुळे OBC राजकीय आरक्षणासाठी हालचाली वाढू लागल्या असल्याचे दिसून येत आहे.

याप्रसंगी काँग्रेस कमिटीचे OBC विभागाचे उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष विजय राऊत, प्रदेश उपाध्यक्ष मिलिंद चित्ते, प्रदेश सरचिटणीस यशवंत खैरनार, प्रदेश सचिव मयूर वांद्रे, नाशिक शहराध्यक्ष गौरव सोनार, बागलाण तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष अरुण नंदन आदी उपस्थित होते.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here