राम शिंदे
सर्वतीर्थ टाकेद : २६ जानेवारी व 15 ऑगस्ट रोजी दिल्लीतील लालकिल्ला राजपथावर होणाऱ्या संचलनात सहभागी व्हावे असे अनेक विद्यार्थ्यांचे स्वप्न असते. रिपब्लिक डे अर्थात आरडी परेड ही अत्यंत मानाची समजली जाते. याच परेडमध्ये सहभागी होण्यासाठी विद्यार्थी प्रचंड शारीरिक मेहनत करतात.
अशीच मेहनत घेत यावर्षी स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृतमहोत्सवानिमित्त नाशिकचे नाव दिल्लीत उज्वल करणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील भोसला मिलिटरी महाविद्यालयाचा एनसीसी चा विद्यार्थी सुदेश विठ्ठल वारूंगसे याची दिल्लीत लालकिल्ल्यावर होणाऱ्या संचलनासाठी निवड करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर संदेशने या संचलनात महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व करत महाराष्ट्राची संस्कृती, तसेच अस्मितेचे दर्शन घडवले.
भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त दरवर्षी भारतातील प्रत्येक राज्यातील एनसीसी च्या विद्यार्थ्यांची दिल्लीत होणाऱ्या संचलनासाठी निवड करण्यात येते. यासाठी विद्यार्थी खुप मेहनत घेत असतात. यावर्षी नाशिक येथील भोसला मिलिटरी महाविद्यालयांमध्ये शिकणारा एनसीसी चा विद्यार्थी संदेश विठ्ठल वारूंगसे याची दिल्लीत होणाऱ्या संचलनासाठी निवड करण्यात आली होती.
यावेळी भोंसला मिलिटरी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. कुलकर्णी, एनसीसी ANO योगेश भदाने व भोंसला कॉलेजचे श्री.बेलगावकर, लेखापरीक्षक ऑडिटर विष्णू वारूंगसे यांच्या वतीने संदेशचे अभिनंदन करण्यात आले होते. एनसीसी आणि एनएसएसच्या विविध चाचण्यांतून विद्यार्थ्यांची आरडीसाठी निवड केली जाते. या निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांची दिल्लीत राहण्याची व्यवस्था केली जात असते. या कालावधीत या विद्यार्थ्यांचा सराव करून घेतला जातो. यावेळी स्वातंञ्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त दिल्लीत संचलनासाठी महाराष्ट्र राज्याकडून सहभागी होत आपल्या कलगुणांना वाव देत महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवत नाशिकच्या इतिहासात मानाचा तुरा रोवला असल्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी संदेशला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
” देशाच्या स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवदिनी माझी दिल्लीत लालकिल्ल्यावर होणाऱ्या संचलनासाठी निवड झाल्याची बातमी समजताच माझ्या आनंदाला पारावार राहिला नाही. मी घेतलेल्या मेहनतीचे फळ व शिक्षकांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे माझी निवड झाली आणि मी दिल्लीत देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या समोर चांगल्या प्रकारे परफॉर्मर्स देखील केला असून मला नेतृत्व करण्याची संधी मिळाली आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीचे व अस्मितेचे दर्शन घडवत मी देशाच्या अमृतमहोत्सव दिवसाचा साक्षीदार देखील झालो यापेक्षा दुसरा कुठला आनंद होऊच शकत नाही.
– सुदेश वारूंगसे.(विद्यार्थी, एनसीसी भोसला मिलिटरी महाविद्यालय.नाशिक.)
“अथक मेहनत-परिश्रम घेत आत्मविश्वासाच्या जोरावर माणूस कोणत्याही क्षेत्रात यश संपादन करू शकतो याचं जिवंत उदाहरन म्हणजे आमच्या बेलगावातील विद्यार्थी सुदेश वारुंगसे.सुदेश ने त्याच्याकुटुंबासह बेलगाव व इगतपुरी तालुक्याचे देखील नाव दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहचविले याचा आम्हांला सार्थ अभिमान आहे.” AA
– विष्णू वारुंगसे लेखापरिक्षक ऑडिटर नाशिक
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम