Infotech news | आता अँड्रॉइडपेक्षाही स्वस्त किंमतीत मिळणार नवा आयफोन

0
2

Infotech news |  iPhone SE 4 बाबत जी माहिती आतापर्यंत आली आहे, त्यानुसार ह्यात iPhone 14 सारखी फ्रंट डिजाइन असणार आहे. तसेच अशी बातमी आली आहे की कंपनी iPhone 15 प्रमाणे ह्यात अ‍ॅक्शन बटनही देणार आहे.

iPhone 15 ह्या सीरीजमध्ये अ‍ॅप्पलनं यूएसबी टाइप सी पोर्टचाही समावेश केला आहे. जो iPhone SE 4 मध्ये देखील मिळनारा आहे. हे सर्व एलिमेंट्स मिळून 4RMD नावाच्या डिजाइनरने फोनचा हा कॉन्सेप्ट व्हिडीओ तयार केलेला आहे.

ह्या व्हिडीओत दिसत आहे की, हा फोन मॉडर्न लुकसह येणार आहे. पण, ह्या फोनमध्ये सिंगल कॅमेरा असणार आहे. मागे असलेला हा कॅमेरा ४८ मेगापिक्सलचा सेन्सर असणार, जो 4K व्हिडीओही रेकॉर्ड करू शकणार आहे.

Crime news | सोन्याचे दागिने लांबवलेच पण, तरुणीचेही केले अपहरण

ह्या फोनमध्ये ६.१ इंचाचा OLED डिस्प्ले देण्यात आलेला आहे. याची बॅटरी कपॅसिटी ३२४०mah असणार आहे. पण, रिलीजच्या वेळी फोनच्या स्पेसिफिकेशन्स मध्ये काही बदल होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही.

iPhone SE 4 मध्ये कंपनी आपला ४नॅनोमीटर प्रोसेसिंगवर बनलेला A16 बायोनिक चिप देण्याची शक्यता आहे. व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे हे चिप iPhone 15 प्रमाणेच परफॉर्मन्स देणार आहे.

सध्या सर्व अंदाज हे कॉन्सेप्ट व्हिडीओच्या आधारावरच व्यक्त केले जात आहेत. त्यामुळे जेव्हा हा आयफोन लाँच होईल तेव्हा यात बदल झालेलाही दिसू शकतो.

लाँचपूर्वीच OnePlus 12 च्या स्पेसिफिकेशन्स, डिजाइन आणि व्हेरिएंट्सची माहिती व्हायरल


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here