Rule Change| उदया पासून सुरू होणाऱ्या नोव्हेंबर महिन्यात सर्वसामान्यांचे बजेट कोलमडण्याची शक्यता आहे. आता १ नोव्हेंबरपासून काही काही महत्त्वाच्या आर्थिक नियमांमध्ये मोठे बदल होणार असून, आता ह्या नियमांचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. यामुळे आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडण्याची शक्यता आहे.
नोव्हेंबर महिन्यात दिवाळी तसेच उत्तर भारतीयांचा छट पूजा हे दोन सण आहेत. त्यामुळे आधीच खर्च वाढणार असताना अनेक आर्थिक नियमदेखील बदलण्यात आले आहे. १ नोव्हेंबरपासून एलपीजी सिलेंडरच्या किंमतींमध्ये बदल होण्याची शक्यता आहे, एवढेच नाहीतर, जीएसटी, ई-चलान यासह इतरही नियम बदलणार आहेत.
एलपीजी सिलेंडरच्या किंमती…
व्यावसायिक तसेच घरगुती सिलेंडरच्या किमती प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला जाहीर होतात. सरकारी पेट्रोलियम कंपन्या दर महिन्याच्या १ तारखेला एलपीजीच्या किंमतींमध्ये बदल करत असतात. दरम्यान, पाच राज्यांतील आगामी निवडणुका लक्षात घेता, नोव्हेंबर महिन्यात घरगुती सिलिंडरच्या दारांमध्ये कपात होण्याची शक्यता आहे. याशिवाय सीएनजीच्या दारांमध्येही चढउतार होण्याची शक्यता आहे.
40 वर्षांचा मराठा आंदोलनाचा प्रवास; अण्णासाहेब पाटील, जयश्री पाटील अन् आता जरांगे पाटील
ई-चलान, जीएसटी नियम
नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरनुसार, १०० कोटी किंवा त्यापेक्षा जास्त उलाढाल असलेल्या व्यवसायांना १ नोव्हेंबरपासून ३० दिवसांच्या आत ई-चलन पोर्टलवर GST चलन अपलोड करावे लागणार आहे. जीएसटी प्राधिकरणाने सप्टेंबर महिन्यात हा निर्णय घेतला होता. एनआयसीनुसार, १०० कोटी रुपये किंवा त्यापेक्षा जास्त उलाढाल असणाऱ्या उद्योगपतींना १ नोव्हेंबरपासून पुढील ३० दिवसांत पोर्टलवर ई-चलान अपलोड करावं लागणार आहे.
केवायसी बंधनकारक
१ नोव्हेंबरपासून, भारतीय विमा नियामक व विकास प्राधिकरणाने सर्व विमा धारकांना केवायसी करणे बंधनकारक केले आहे. याचा परिणाम तुमच्या क्लेमवर होणार आहे. आणि नियमांचे पालन न केल्यास क्लेम रद्द केला जाणार आहे.
व्यवहार शुल्क वाढणार
बॉम्बे स्टॉक एक्सचेंजने २० ऑक्टोबरला असे जाहीर केले होते की, १ नोव्हेंबरपासून इक्विटी डेरिव्हेटिव्ह विभागावरील व्यवहार शुल्क वाढणार आहेत. हे बदल S&P BSE सेन्सेक्स पर्यायांवर लागू होणार आहेत. व्यवहाराच्या वाढत्या खर्चाचा व्यापाऱ्यांवर, विशेषतः किरकोळ गुंतवणूकदारांवर नकारात्मक परिणाम होन्याची शक्यता आहे.
Andolan effects: आ.राहुल आहेर चले जाव…! ; डॉ. कुंभार्डे एकतच राहिले तर केदा आहेरांचे आंदोलकांनी केले स्वागत
इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किंमती महागणार
सरकारने HSN ८७४१ श्रेणीतील लॅपटॉप, टॅब्लेट, संगणक तसेच इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या आयातीवर ३० ऑक्टोबरपर्यंत सूट दिली होती. पण, याबाबत अद्याप कुठलीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. त्यामुळे १ नोव्हेंबरपासून काय काय बदल होणार आहेत हे पहावं लागणार आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम