Navratri Utsav 2023 | मुंबईसह संपूर्ण राज्यभरात मराठी आणि गुजराती वाद अद्यापही शांत झालेला नसून आणखी वेगाने डोकं वर काढत आहे. नवी मुंबईतील कामोठे येथे नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात “पटेल समाजाशिवाय इतरांना प्रवेश नाही” असे थेट फलक लाऊन प्रवेश नाकारण्यात आला आहे. पटेल समाजाव्यतिरिक्त इतरांना प्रवेश नसल्याचे फलक बघून मनसैनिकांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा हाती घेतला आहे.
Maharashtra Politics| ठाकरेंना मोठा धक्का..! तीन मोठे नेते शिंदेंच्या गळाला
या प्रकरणातदेखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मनसे स्टाईलने भूमिका घेत तेथील गुजराती दोषी व्यक्तींना माफी मागायला लावली होती. या प्रकरणानंतर मनसेकडून संतप्त प्रतिक्रिया देत राज ठाकरेंनी काढलेले एक जुनं व्यंगचित्र शेअर केलं होतं.राज्याभरात सर्वत्र नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात सुरू असताना मुंबईत पुन्हा मराठी – गुजराती वाद पेटतांना दिसत आहे. पण येथेही मनसेने स्वत: उपस्थित राहून हा वाद मिटवला. तसेच आयोजकांना चांगलाच समजही दिला आहे.
IRCTC Vaishno Devi Package| ह्या नवरात्रीत फक्त ८ हजारांत करा वैष्णोदेवीचे दर्शन…
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम