Maratha reservation| नाशिक जिल्ह्यातील पाचशे गावांत पुढाऱ्यांना ‘नो एन्ट्री’ 

0
44

Maratha reservation| आरक्षणासाठी सकाळ मराठा समाज आक्रमक झाला असून, गावबंदीचा वणवा हा आता संपूर्ण महाराष्ट्रात पसरला आहे. दरम्यान, एकट्या नाशिक जिल्ह्यातच पाचशे गावांनी पुढाऱ्यांना गावबंदी केल्याचे मराठा आंदोलकांकडून सांगण्यात आले आहे आणि जवळपास तीनशेपेक्षा जास्त पाठींब्याचे पत्रही आल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता संपूर्ण जिल्हा एकवटला असून मराठा समाज आता आरक्षणासाठी पेटून उठला आहे.

मराठा आरक्षणासाठीचे हे आंदोलन आता राज्यभरात आक्रमक होत आहे. मनोज जरांगे यांच्या आवाहनानंतर संपूर्ण राज्यभरात  नेत्यांना व पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात येत आहे. दरम्यान, नाशिकमध्ये सुरवातीला एका गावाने आणि नंतर हळूहळू संपूर्ण जिल्ह्यातच गावबंदी करण्यात आली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या ह्या आंदोलनात जिल्ह्यातील ५०० गावांत राजकीय नेत्यांना तसेच पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आली आहे आणि ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, अशी माहिती सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आली आहे.

Ajit Pawar| अजित दादांना मराठ्यांचा फटका; बारामतीचा दौरा रद्द…

नाशिकमध्ये गेल्या ४५ दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषण सुरु आहे. मनोज जरांगे हे नाशिक दौऱ्यावर आले असता, त्यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली होती. अनेक गावांतील ग्रामपंचायती तसेच विविध समुदायांनी आरक्षणाच्या समर्थनार्थ पत्रदेखील दिले आहे. नाशिकमध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषण सुरू होते. त्याला दिवसेंदिवस प्रतिसाद हा वाढत आहे. दारमान, आतापर्यंत पाचशे गावांमध्ये गावबंदी झाल्याची माहिती समोर आली आहे. आता मराठा आरक्षणाबाबत व्यापक जनजागृतीसाठी रविवारपासून गावागावांत बैठका घेतल्या जाणार आहेत. या आंदोलनात प्रत्येकाला शक्य, त्या मार्गाने सहभागी होण्याचे आवाहन केले जाणार असल्याचीही माहिती आंदोलकांनी यावेळी दिली आहे.

गावागावांत बैठका…  

मराठा समाजाच्या वतीने नाशिक जिल्हा न्यायालयासमोरील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे सुरू असलेल्या साखळी उपोषणाचा काल ४५ वा दिवस होता.  दरम्यान, आजपासून मराठा समाजाचे कार्यकर्ते गावागावांत बैठका घेऊन मराठा समाजाशी चर्चा करणार आहेत. आरक्षणासाठी शहरातील मध्यवर्ती ठिकाणी सुरू असलेल्या उपोषणस्थळी रोज अनेक संस्था, विविध समुदायांतील मंडळी भेट देऊन आरक्षणाला लेखी स्वरूपात पाठिंबा देत आहेत. आतापर्यंत ३०० पेक्षा अधिक पाठिंब्याची पत्रं उपोषणकर्त्यांना प्राप्त झाली आहेत. ही सर्व पत्रं मुख्यमंत्र्यांना निवेदनासोबत पाठवणार आहेत. मराठा समाज हा गेल्या कित्येक वर्षांपासून आरक्षणासाठी लढा देत आहे. पण, निष्क्रिय आमदार, खासदार, मंत्री आणि आजवरच्या सरकारने मराठा समाजाच्या पदरी नेहमी निराशाच दिली. आता हा लढा निर्वाणीचा आहे. असे उपोषणकर्त्यानी यावेळी म्हटले आहे. मात्र, सध्या प्रत्येक गावागावांच्या वेशीवर पुढाऱ्यांसाठी गावबंदीचे फलक दिसत आहेत.

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here