नाशिक प्रतिनिधी – शहरात उद्या होणाऱ्या गणरायाच्या विसर्जनाची तयारी महानगरपालिकेकडून पूर्ण झालेली आहे. महापालिकेने शहरातील विविध भागात बाप्पाला निरोप देण्यासाठी २९ नैसर्गिक व पारंपरिक विसर्जनस्थळे व ४३ कृत्रिम तलावांची व्यवस्था केली आहे, तसेच गणेशमूर्ती संकलनाची सोयही महापालिकेकडून करण्यात आली आहे.
तसेच शहरात सतत सुरु असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी नद्या-नाल्यांच्या पाणीपातळीत वाढ झाल्याचे बघता अनूचित प्रकार टाळण्यासाठी ह्या सर्व विसर्जनस्थळांवर १६ जीवरक्षक तैनात असणार आहेत.
https://www.instagram.com/tv/CiNRl3qOkZM/?utm_source=ig_web_copy_link
महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी याबाबत माहिती देताना, नागरिकांनी गणेशमूर्तीचे विसर्जन करताना स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन यावेळी केले आहे. तसेच, गणेशमूर्तींचे नदीपात्रात विसर्जन न करता मनपाच्या गणेश विसर्जनस्थळांवर गणेशमूर्ती आणि निर्माल्यदान करावे, अशी विनंतीही केली आहे.
विभागनिहाय नैसर्गिक व कृत्रिम तलावे :
नाशिक पूर्व – ३ नैसर्गिक व ८ कृत्रिम
नाशिकरोड – ५ नैसर्गिक व ८ कृत्रिम
पंचवटी – ८ नैसर्गिक व ६ कृत्रिम
सिडको – १ नैसर्गिक व ७ कृत्रिम
नाशिक पश्चिम – ७ नैसर्गिक व ८ कृत्रिम
सातपूर – ५ नैसर्गिक व ६ कृत्रिम
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम