नाशिक प्रतिनिधी – काही दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठीच्या सोडतीत बदल करून आता ओबीसी आरक्षण सोडतीसह सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठीचे आरक्षण सोडत निकाली काढले आहे. त्यानुसार आज इतर मागासवर्गाच्या ३२ (महिलांसाठी १८) जागा तर सर्वसाधारण महिला गटासाठीच्या ३४ जागांसाठी फेर सोडत काढण्यात आली. राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार ही सोडतप्रक्रिया शहरातील महाकवी कालिदास कलामंदिर येथे पार पडली.
नागरिकांचा मागास प्रवर्ग प्रभाग (एकूण १४ जागा)
प्रभाग ४ ब, १४ ब, १५ ब, २० ब, २२ ब, २३ ब, २४ ब, २५ ब, २६ ब, ३५ ब, ३९ ब, ४१ ब, ४२ ब आणि ४३ ब.
नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव प्रभाग (एकूण १८ जागा)
प्रभाग ८ अ, ९ अ, १० अ, १५ ब, १८ अ, १९ अ, २० ब, २१ अ, २३ ब, २४ ब, २५ ब, २९ अ, ३० अ, ३२ अ, ३३ अ, ३८ अ, ३९ ब आणि ४२ ब.
सर्वसाधारण महिला राखीव प्रभाग (एकूण ३४ जागा)
प्रभाग १ ब, २ ब, ३ ब, ५ ब, ६ ब, ७ क, ८ क, ९ ब, १० ब, १२ ब, १३ ब, १४ क, १५ क, १६ ब, १७ ब, १८ ब, १९ ब, २० क, २१ ब, २३ क, २७ क, २८ ब, २९ ब, ३० ब, ३१ ब, ३२ ब, ३३ ब, ३५ क, ३६ ब, ३७ ब, ३८ ब, ३९ क, ४० ब आणि ४४ क.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम