देवळा : निरंजन देवळा विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी योगेश शांताराम आहेर यांची तर व्हा चेअरमन पदी जिजाबाई खंडेराव आहेर यांची बिनविरोध निवड करण्यात आली . निरंजन देवळा विकास सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक ९ मार्च रोजी बिनविरोध झाली .
या संस्थेच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीसाठी आज मंगळवारी (दि ११ )रोजी निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहायक निबधक सुजय पोटे यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी १ वाजता संचालक मंडळाची बैठक बोलाविण्यात आली होती . यावेळी चेअरमन पदासाठी योगेश आहेर यांचा तर व्हा चेअरमन पदासाठी जिजाबाई आहेर यांचा निर्धारित वेळेत अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली .
याप्रसंगी दगा आहेर, प्रदीप आहेर, रविंद्र आहेर, सुनील आहेर, दीपक आहेर, राजेश आहेर, उत्तम आहेर, दीपक निकम ,दादाजी सोनारे, विमलबाई आहेर, शांताबाई गुजरे , सचिव संदीप ठुबे आदी उपस्थित होते . नूतन पदाधिकाऱ्यांचे सहकार क्षेत्रातून अभिनंदन होत आहे .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम