Skip to content

Nitin desai suicide : नितीन देसाईंच्या आत्महत्येप्रकरणी आली ही माहिती समोर


Nitin desai suicide  सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी आज सकाळी आपल्या कर्जत येथील अंडी स्टुडिओमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.

नितीन देसाई यांनी आत्महत्या का केली याचं कारण अजून स्पष्ट झालं नसलं तरी मात्र त्यांच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला जात आहे. त्यांच्या आत्महत्या प्रकरणी पोलिसांकडून सखोल चौकशी देखील केली जात आहे. यातच पोलिसांच्या हाती आता नितीन देसाई यांनी आत्महत्या करण्यापूर्वी रेकॉर्ड केलेला काही ऑडिओ क्लिप्स हाती लागल्या असल्याची माहिती दिली आहे.Nitin desai suicide update

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन देसाई यांनी आत्महत्या करण्यापूर्वी काही व्हॉइस नोट रेकॉर्ड करून ठेवले असल्याच समोर आल आहे. या व्हॉइस रेकॉर्डमध्ये चार व्यावसायिकांची नावे नितीन देसाई यांनी घेतली असल्याचं बोललं जात आहे.Nitin desai suicide update

सोमवारी रात्री नितीन देसाई हे दिल्लीहून मुंबईला विमानाने आले यानंतर मुंबई एअरपोर्ट वरून अडीच वाजेच्या सुमारास ते आपल्या गाडीतून कर्जत मधील एनडी स्टुडिओमध्ये आले यावेळी त्या ठिकाणच्या मॅनेजर सोबत बोलत असताना त्यांनी सकाळी मी तुला व्हॉइस रेकॉर्डर देतो असे देखील सांगितले होते.

देसाई यांनी सांगितल्याप्रमाणे मंगळवारी सकाळी मॅनेजरने व्हॉइस रेकॉर्डर साठी देसाई यांच्या सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र सकाळी मेगा हॉल जवळ नितीन देसाई गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले Nitin desai suicide update त्यावेळी व्हॉइस रेकॉर्डर त्यांच्या मृतदेहाच्या बाजूलाच असल्याचं आढळून आल्याने पोलिसांनी हा व्हॉइस रेकॉर्डर ताब्यात घेऊन तपास सुरू केला. यामध्ये काही व्हॉइस नोट्स अढळून आल्या आहेत. ज्यामध्ये चार व्यवसायिकांनी आपल्याला कसे छळले, आर्थिक व्यवहारानंतर आपल्यावर कसा दबाव आणला गेला हे रेकॉर्ड केलं असल्याची माहिती असल्याचं सांगण्यात आल आहे.Nitin desai suicide update

https://thepointnow.in/breaking-news/

दरम्यान नितीन देसाई यांच्या आत्महत्या प्रकरणी तूर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून या प्रकरणाची पोलिसांकडून गांभीर्याने दखल घेऊन चौकशी सुरू आहे.Nitin desai suicide update याचबरोबर नितीन देसाई यांनी रेकॉर्ड केलेल्या ऑडिओ क्लिप मध्ये उल्लेख असलेल्या चारही व्यावसायिकांची देखील चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.Nitin desai suicide update


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!