Breaking news : सुला वाइन्स कंपनीला ११६ कोटी रुपये भरण्याची नोटिस ; हे आहे कारण

0
15

Breaking news : “महाराष्ट्र निर्मित बिअर आणि वाईन नियम, १९६६ अंतर्गत, कस्टम सीमा ओलांडून किंवा इतर राज्यांमधून आणलेल्या वाइनचे मिश्रण करून महाराष्ट्रात उत्पादित किंवा उत्पादित केलेल्या वाइनवर उत्पादन शुल्क वसूल केले जाते. या आधारावर कंपनीला नोटीस बजावण्यात आली आहे. सुलाने तशी माहिती मुंबई स्टॉक एक्स्चेंज (बीएसई)ला दिली आहे.

जगप्रसिद्ध असलेल्या सुला विनयार्डस कंपनीला तब्बल ११६ कोटी रुपये भरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यासंदर्भात उत्पादन शुल्क मंत्र्यांनी विनयार्डसला नोटीस जारी केली आहे. दरम्यान, या नोटिशीचा परिणाम सुलाच्या शेअर्सवरही झाला आहे. सुलाचे शेअर्स सकाळी ७ टक्क्यांनी घसरल्याच बघायला मिळालं.

सुलाने त्यांचा आयपीओ नुकताच आणला आहे. त्यातच ३१ जुलै रोजी राज्य उत्पादन शुल्क मंत्र्यानी सुला विनयार्डसला एक नोटीस बजावली आहे. सुला ही आघाडीची वाइन उत्पादक कंपनी आहे. महाराष्ट्र उत्पादन शुल्क विभागाकडून ११६ कोटी रुपयांच्या अबकारी शुल्काची नोटीस सुलाला बजावण्यात आली आहे.

सुला विनयार्ड्सकडून उत्पादन शुल्क वसुलीसाठी नाशिक जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या डिमांड नोटीसवर दिलेली अंतरिम स्थगिती मंत्र्यांनी उठवली. त्यानंतर ही नोटीस बजावण्यात आली आहे. परिणामी, आज बुधवारी सुला विनयार्ड्सचे शेअर्स सुरुवातीच्या ट्रेडिंग सत्रात सुमारे ७ टक्क्यांनी घसरले आहेत.

दरम्यान कंपनीने तात्काळ १ ऑगस्ट रोजी मुंबई उच्च न्यायालयासमोर रिट याचिका दाखल करून या नोटिशीला आव्हान दिले आहे. “कंपनीला कायदेशीररित्या सूचित करण्यात आले आहे की डिमांड नोटीस कायद्याने योग्य नाही. कंपनी या प्रकरणातील पुढील घडामोडींवर स्टॉक एक्सचेंज अपडेट करेल,” असे सुला विनयार्ड्सने एक्सचेंज फाइलिंगमध्ये म्हटले आहे.

कंपनीचे एकूण बाजार भांडवल केवळ ३ हजार कोटी रुपये आहे. मंगळवारी हा शेअर ५१६.२५ रुपयांवर स्थिरावला होता. सुला विनयार्ड्सने सांगितले की, स्टॉक एक्स्चेंज फाइलिंगनुसार, सध्याच्या व्यवसायावर किंवा कंपनीच्या क्रियाकलापांवर या आदेशाचा परिणाम होत नाही कारण ती चालवण्याचा प्रयत्न करत आहे. आमचा व्यवसाय सध्याच्या कायद्यांचे आणि नियमांचे पालन करून होत आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here