Skip to content

निंबोळा विकास संस्थेच्या चेअरमन पदी दिलीप पाटील यांची निवड


देवळा ; तालुक्यातील निंबोळा येथील कै लालजी दौलत पाटील विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या चेअरमन पदी दिलीप लालजी पाटील याची तर व्हा.चेअरमन पदी संजय जिभाऊ निकम यांची बिनविरोध निवड झाली . संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत” शेतकरी लोकनेते स्व लालजी आप्पा पॅनलने” सर्व तेरा जागांवर विजय मिळवत स्पष्ट बहुमत प्राप्त केले आहे .

निंबोळा येथील कै लालजी दौलत पाटील विकास संस्थेचे नूतन चेअरमन दिलीप पाटील ,व्हा चेअरमन संजय निकम व संचालक मंडळ आदी (छाया – सोमनाथ जगताप )

सोमवारी (दि ४) रोजी या संस्थेच्या चेअरमन व व्हा चेअरमन पदाच्या निवडीसाठी सहायक निंबधक कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची बैठक घेण्यात आली . यावेळी सर्वानुमते चेअरमन पदी बाजार समितीचे माजी उपसभापती दिलीप पाटील व व्हा चेअरमन पदी संजय निकम यांची बिनविरोध निवड करण्यात आली . याप्रसंगी संचालक सर्वश्री भाऊसाहेब निकम, मधुकर निकम, सुखदेव निकम ,अभिमन पवार , आप्पा बोरसे ,दत्तू सावन्त, विलास सावन्त , दगा शिवदे , हिरामण आहिरे, सुनीता निकम ,कमलाबाई निकम उपस्थित होते .

नूतन पदाधिकाऱ्यांनी देवळा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले . यावेळी पॅनलचे समर्थक कार्यकर्ते उपस्थित होते .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!