‘हिंमत असेल तर मध्यावधीला सामोरे या…..!’


राज्यात राजकीय भूकंपानंतर मोठी उलथापालथ झाली असून शिवसेनेतील या मोठ्या बंडखोरीनंतर सत्ता गमावलेल्या उद्धव ठाकरेंनी आज भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली. हिंमत असेल तर मध्यावधी निवडणुका लढून दाखवा, असा टोला शिवसेनेला बळकट करण्यासाठी झटणाऱ्या ठाकरेंनी भाजपला दिला. असा खेळ करण्यापेक्षा जनतेच्या दरबारात जाऊया, चुकलो तर जनता आम्हाला घरी बसवतील, तुम्ही चुकलो तर जनता तुम्हाला घरी बसवतील.

उद्धव ठाकरे म्हणाले, “”आता जे काही चालले आहे ते डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान मोडण्याचा प्रयत्न करत आहेत. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात महाराष्ट्रात काय सुरू झाले आहे ते सर्व सत्य सांगा. विधानसभेचे मनमानी कारभार हा संविधानाचा अपमान आहे असा घणाघात ठाकरे यांनी केला.

लढायचे असेल तर माझ्यासोबत राहा.
तुम्हाला लढायचे असेल तर माझ्यासोबत राहा, असे त्यांनी पक्षाच्या जिल्हाध्यक्षांना सांगितले. शिवसेनेला नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप माजी उद्धव ठाकरे यांनी केला.

शिवसेनेतील बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे यांनी नुकताच मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर बंडखोर गटाचे नेतृत्व करणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या मदतीने सरकार स्थापन केले. आज त्यांनी विधानसभेतही आपले बहुमत सिद्ध केले.

288 सदस्यीय विधानसभेत 164 आमदारांनी विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने मतदान केले, तर 99 आमदारांनी विरोधात मतदान केले. तीन आमदार मतदानापासून दूर राहिले. दुसरीकडे, काँग्रेसचे अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार यांच्यासह २१ आमदार विश्वासदर्शक ठरावाला अनुपस्थित राहिले. शिवसेनेच्या एका आमदाराच्या निधनानंतर विधानसभेतील आमदारांचे सध्याचे संख्याबळ २८७ वर आले आहे. त्यामुळे बहुमतासाठी 144 मतांची गरज होती.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Leave a Comment

Don`t copy text!