मुंबईसह ठाणे आणि संपूर्ण कोकण विभागात जोरदार पावसाला सुरवात झाली असून येत्या काही दिवसांत पावसाचा जोर अधिक वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. सोमवारी दुपारपासून सुरु झालेला पाऊस मंगळवारीही तसाच जोरदार सुरु आहे. पावसामुळे अनेक भागांत जनजीवन विस्कळीत झाल्याच चित्र पाहायला मिळतंय. देशाच्या पश्चिम किनारपट्टी भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबई महाव्यवस्थापन पालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाला भेट दिली. यावेळी त्यांनी पावसामुळे निर्माण होणाऱ्या परीस्थितीचा आढावा घेतला आणि संबंधित सूचनाही अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.मुंबई शहर आणि उपनगरात ५ हजार सीसीटीव्ही कॅमेरे आहेत आणि याच माध्यमातून संपूर्ण शहरात पावसाच्या सद्यस्थितीवर नियंत्रण ठेवल जातंय याच कॅमेरांच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहरातील परिस्थितीचा आढावा घेतला ,यासंदर्भातील माहिती महापालिका आयुक्त इक्बाल सिंह यांनी दिली.
पावसाच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी हि भेट दिली जात असल्याच बोल जातंय पण अनेकांना मात्र यातही राजकीय डावपेच दृष्टीस येतोय. मुंबई महापालिकेवर सध्या शिवसेनेचं वर्चस्व आहे त्यामुळे आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे आपला प्रभाव पाडतांना दिसून येतंय
भारतीय हवामान खात्याकडून (IMD) राज्यात पुढील ४ दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.विशेषतःकोकण विभागातील सर्वच जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय आणि म्हणूनच मुंबईसह कोकण विभागांत NDRF चे ९ पथक तैनात करण्यात आली आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम