नाशिक : जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या नूतन पदाधिकाऱ्यांनी आज विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांची मुंबईत सदिच्छा भेट घेतली.
आज मुंबईत मविप्र संस्थेचे सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे, सभापती बाळासाहेब क्षिरसागर व संचालक डॉ. सयाजीराव गायकवाड यांनी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते अजित पवार यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीप्रसंगी आमदार दिलीप बनकर व डॉ. अशोक पिंगळे हेदेखील उपस्थित होते. यावेळी अजित पवार यांनी संस्थेच्या कारभाराबाबत पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले व भविष्यात संस्थेला मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.
यापूर्वी संस्थेची निवडणूक पार पडल्यानंतर संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे भेट घेतली होती. तेव्हा शरद पवार यांनी आपल्या राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टमार्फत १ कोटी तर पक्षाच्या अनेक नेत्यांनी मिळून दीड कोटींची मदत संस्थेला देऊ केली होती. तसेच त्यांनी संस्थेच्या सर्व अडचणी सोडवण्यासाठी आपण खंबीरपणे उभे राहणार असल्याची ग्वाही दिली होती.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम