NDCC बँकेतील ‘प्रामाणिक’ संचालक पदाधिकाऱ्यांना चौकशीची भीती का ? सचिवांना पुढे करून ‘स्टे’ आणण्याची तयारी सूत्रांची माहिती

0
102
जिल्हा बँक

नाशिक प्रतिनिधी : नाशिक जिल्हा बँकेतील कथित गैरव्यवहार मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. तत्कालीन संचालक तसेच पदाधिकारी यांच्या संगनमताने गैरव्यवहार झाल्याचा आरोप , शिवसंग्राम संघटनेचे प्रदेशअध्यक्ष उदयकुमार आहेर यांनी केला. तसेच सर्व पुरावे त्यांनी संबंधित विभागाला सादर केले व चौकशी सुरू झाली. मात्र ही चौकशी होऊ नये ती थांबावी यासाठी नेते मंडळी सर्वर्थाने प्रयत्नशील आहेत. सचिवांच्या संघटनेला पुढे करून कोर्टातून स्थगिती आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याची खात्रीपूर्वक सूत्रांची माहिती आहे.

अधिकारी संचालक प्रामाणिक मग चौकशी ला स्थगिती का हवी ?

जिल्हा बँकेत गैरव्यवहार झाला नसल्याचा कांगावा तत्कालीन संचालक,पदाधिकारी तसेच सचिव करताय. जर गैरव्यवहार झाला नाही तर मग कोर्टात जाऊन चौकशी थांबावी म्हणून स्थगिती आणण्याची केविलवाणी धडपड का केली जातेय हा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. अनेक संचालकांनी माजी मुख्यमंत्री तसेच, वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेतल्याची माहिती देखील खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. गैरव्यवहार झालाच नाही अस म्हणत असतांना दुसऱ्या बाजूला चौकशी ला प्रामाणिक अधिकारी व संचालक का घाबरताय का बिथरले असे अनेक प्रश्न उपस्थित होतायत.

काय आहे घोटाळा ?

खातेदार तसेच ठेवीदारांना पैसे मिळत नाही एक ठराविक मर्यादा ठरवून दिली आहे. सर्वसामान्यांना वेठीस धरण्यात येत असतांना सचिवांवर बँक मात्र मेहरबान असल्याचे चित्र समोर आले. सानुग्रह अनुदानाच्या नावाखाली सचिवांना नियमबाह्य पद्धतीने पैसे देण्यात आले. तसेच यात टक्केवारी ने पैसे देण्यात आल्याचा देखील आरोप केलेला आहे. या सर्व प्रकाराची चौकशी सुरू असून सत्य समोर येणार आहे मात्र ही चौकशी बेकायदेशीर असून थांबवावी यासाठी तत्कालीन संचालक मंडळ तसेच सचिवांनी कोर्टात धाव घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.

खरे’ गेले अन ‘आहेर’ आले

जोपर्यंत चौकशी ‘खरे’ या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली होत होती तेव्हा सर्व पदाधिकारी व संचालक निर्धास्तपणे होते. मात्र उदय आहेर यांनी चौकशी अधिकारी बदलण्याची मागणी केली व ते मान्य झाले ‘खरे’ गेले अन ‘आहेर’ आले तेव्हा या चौकशीत रंगत चढली व नेत्यांची पळापळ सुरू झाली. जिल्हा बँकेत सर्वपक्षीय नेत्यांचे हितसंबंध असल्याने सर्वसामान्यांसाठी मात्र कोणीही पुढे येतांना दिसत नाही. जिल्ह्यातील सर्व राजकीय पुढारी जिल्हाबँकेच्या राजकारणात सक्रिय असतात. म्हणून या चौकशीसाठी अनेक अडचणी येण्याची चिन्हे आहेत.

कितीही कांगावा करा गाठ माझ्याशी – उदयकुमार आहेर

सचिवांना पुढे करून ‘स्टे’ आण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती मिळतेय. मात्र न्यायव्यवस्था कमकुवत नाही हे भ्रष्टाचारी जनेतला वेड्यात काढताय तस न्यायव्यवस्थेला काढू शकत नाही. मी सर्व पुरावे सादर केले आहेत,त्याला स्थगिती येणं शक्य नाही. निर्दोष आहेत मग सैरभैर का झालेत हा मला प्रश्न आहे. यांनी कितीही कांगावा केला तरी गाठ माझ्याशी आहे. मी कोर्टात बाजू मांडण्यासाठी सक्षम आहे.

या सर्व प्रकरणासंदर्भात तत्कालीन जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा आहेर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला, मी सध्या बँकेच्या पदावर नाही त्या प्रकरणाची मला काही माहिती नाही, म्हणून प्रतिक्रिया द्यायचा विषय येत नाही असे आहेर यांनी ‘द पॉइंट नाऊ’च्या प्रतिनिधींशी बोलतांना सांगितले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here