द पॉइंट नाऊ: लग्न म्हणजे सात जनमाच्या गाठी बांधल्या जातात अस समजल जाते मात्र आता या गाठी फारच सैल झाल्याचे निदर्शनास आले आहे. उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यात लग्नाच्या चार महिन्यांनंतर नववधू प्रियकरासह लाखो रुपयांचे दागिने आणि 70 हजारांची रोकड घेऊन पळून गेली. फरार होण्यापूर्वी नववधूने तिच्या पतीसह सासरच्या सर्व लोकांना गुंगीचे औषध मिसळून जेवण दिले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून याप्रकरणी सासरच्यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे.
उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यात लग्नानंतर अवघ्या चार महिन्यांत नववधू प्रियकरासह घरातून लाखो रुपयांचे दागिने आणि 70 हजारांची रोकड घेऊन पळून गेली. हे प्रकरण संभल जिल्ह्यातील हल्लू सराय भागातील आहे. दुस-या मजल्यावरून साडीच्या सहाय्याने नववधूने पलायन केल्याची घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लुटलेल्या नववधूने आधी पतीसह सासरच्या सर्व लोकांना जेवणात गुंगीचे औषध मिसळून खाऊ घातले. त्यानंतर घरातील सर्व लोक बेशुद्ध पडल्यावर वधूने घरातून 70 हजार रुपये आणि लाखो रुपयांचे दागिने घेतले. यानंतर नववधू साडीच्या साहाय्याने दुसऱ्या मजल्यावरून खाली उतरली आणि नंतर प्रियकरासह तिथून पळून धूम ठोकली.
ही संपूर्ण घटना घराबाहेर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हलू सराय येथील अंकुश ठाकूरचे चार महिन्यांपूर्वी मध्य प्रदेशातील शिवपुरी येथील मनीषा या तरुणीशी लग्न झाले होते. मनीषाचे पूर्वीपासून शिवपुरी येथील रहिवासी हर्ष शर्मासोबत प्रेमसंबंध होते. 1 सप्टेंबर रोजी मनीषाने हर्षला आधीच फोन केला होता. मनीषाने दरोडा टाकताच ती हर्षसोबत पळून गेली.
सकाळ झाली तेव्हा मनीषाच्या सासरच्या मंडळींचे होश उडाले. घरातून लाखोंचा माल घेऊन मनीषा पलायन झाली होती. कपाट उघडे होते. घराच्या दुसऱ्या मजल्यावर साडी लटकली होती, त्याच्या मदतीने मनीषा खाली उतरली. सासरच्यांनी त्यांच्या घराबाहेर लावलेला सीसीटीव्ही कॅमेरा तपासला तेव्हा हे सर्व उघडकीस आले.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये मनीषा हर्षसोबत निघताना दिसत होती. सध्या पीडितेच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस या प्रकरणाच्या तपासात गुंतले आहेत. मनीषाचा पती अंकुशने सांगितले की, ती घरची कामे करत नाही. मात्र 1 सप्टेंबरच्या रात्री त्याने सर्वांसाठी जेवण बनवले. मग सगळ्यांना जेवण दिले. तिने जेवण केले नाही, त्यानंतर सर्वांना झोपण्यापूर्वी दूध प्यायला दिले. त्यानंतर काय झाले ते काही आठवत नाही असे सासरच्यांनी सांगितले.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये मनीषा हर्षसोबत निघताना दिसत होती. सध्या पीडितेच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाच्या तपासात गुंतले असून मनीषाचा पती अंकुशने सांगितले की, ती घरची कामे करत नाही. मात्र 1 सप्टेंबरच्या रात्री तिने सर्वांसाठी जेवण बनवले. मग सगळ्यांना जेवण दिले. पण तिने स्वतः मात्र अन्न खाल्ले नाही. त्यानंतर सर्वांना झोपण्यापूर्वी दूध प्यायला दिले. त्यानंतर काय झाले ते काही आठवत नाही.
दुसरीकडे संभलचे एएसपी आलोक कुमार जयस्वाल यांनी सांगितले की, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दोघांचा शोध सुरू आहे. मनीषा आणि तिच्या प्रियकराला लवकरच अटक केली जाईल, असा दावा त्यांनी केला.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम