नाशिकरोड कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्याचा आजारपणामुळे मृत्यू

0
25
jail

नाशिक : येथील नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या एका ५५ वर्षीय कैद्याचा आजारपणामुळे मृत्यू झाला आहे. शेख मुक्तार शेख गफूर (५५, रा. चाळीसगाव) असे या मृत्यू झालेल्या कैद्याचे नाव आहे.

जळगाव येथील ओलगाव पोलीस ठाण्यात घडलेल्या प्रकरणात सदर कैद्यावर खुनाच्या आरोपाखाली शिक्षा झाली होती. त्यानंतर त्याची रवानगी नाशिकरोड कारागृहात करण्यात आली होती. मात्र जेलमध्ये शिक्षा भोगत असताना सोमवारी (दि. २६) अचानक त्याच्या प्रकृतीत बिघाड झाली. यावेळी कारागृह रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नीलकंठ ससाणे यांनी त्या कैद्याची तपासणी केली असता, त्याला मृत घोषित करण्यात आले आहे.

दरम्यान, कारागृहातील कर्मचारी दीपक पंडित यांनी दिलेल्या माहितीवरून नाशिकरोड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मुन्तोडे करत आहेत.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here