नाशिक प्रतिनिधी – नाशिक महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने शनिवारी शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
शहराचा पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर आणि मुकेणे धरणांच्या सब स्टेशनमध्ये होणाऱ्या दुरुस्तीसाठी शनिवारी दिवसभर पाणीपुरवठा बंद ठेवत रविवारी सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होणार असल्याचे महापालिकेने कळविले आहे.
मनपाच्या अधीक्षक अभियंतांनी जाहीर निवेदनात सांगताना, मनपाचे मुकणे धरण वॉटर पंपिंग स्टेशन येथील सबस्टेशनमधील दुरुस्ती व गंगापुर धरण पंपिंग स्टेशनमधल्या दुरुस्तीची कामे करण्यासाठी शनिवार दि. २० रोजी सकाळी ९ ते ६ यावेळेत शहराचा पाणीपुरवठा होणार नाही. तसेच रविवार दि. २१ रोजीचा सकाळी पाणीपुरवठा कमी दाबाने होईल, असे सांगितले आहे. यावेळी महानगरपालिकेकडून नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम